शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिपिंग व्यावसायिकाची करोडोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:25 IST

खोटी कागदपत्रे बनवून जमीन विकली

नालासोपारा : मुंबईच्या पवई विभागात राहणाऱ्या शिपिंग व्यवसायिकाची व त्याच्या भागीदाराची नायगाव परिसरातील जमीनीची खोटी कागदपत्रे देऊन करोडो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी वालीव पोलिसांनी चारही आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

मुंबईच्या पवई विभागात राहणारे सोमण अंबाडत हरिदास (54) हे शिपिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी व सन २०१५ साली भागीदार डेल अँन्थोनी रॅली यांनी वसईच्या नायगाव विभागातील सर्व्हे नंबर २८८ मध्ये ३७ गुंठे व सर्व्हे नंबर ३०७ मध्ये १८ गुंठे जमीन मीरारोड परिसरातील बिल्डर आरोपी नसीर खान यांच्याकडून ४ करोड ३० लाख रुपयांना विकत घेतली होती. डिसेंबर महिन्यात जमिनीचा ताबा घेण्यासाठी हरिदास आणि त्यांचे भागीदार रॅली हे गेले असता जमिनीच्या मूळ मालकांनी त्यांना मज्जाव करून आम्ही ही जमीन कोणाला विकली नसल्याचे सांगितले. त्यावेळी हरिदास यांना पाणी कुठे तरी मुरतेय असे वाटल्यावर चौकशी केली असता ती जमिन नसीर खान यांना विकलेली नसल्याचे उघड झाले असून जमिनीची फक्त जनरल पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी बनवून खोट्या सह्या केलेले दस्तावेज सापडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वालीव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी नसीर खान याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी नसीर खान, दयाशंकर तिवारी, सैफुद्दीन हबीबउल्ला आणि वैशाली दुधवाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

याआधी नसीर खान यांच्याकडून स्वस्तात दुकाने विकत घेतली होती. नंतर ३ प्लॉट विकत घेतले होते. १ प्लॉट बरोबर असून बाकीच्या दोन्ही प्लॉटचे बनावट पेपर बनवून ४ करोड ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दोन्ही प्लॉटच्या रजिस्ट्रेशनकरिता ३६ लाख रुपये सुद्धा दिले होते. याने अनेकांना फसवले.- सोमण हरिदास, तक्रारदारमुंबईच्या व्यवसायिकांची जमिनीच्या नावावर आर्थिक फसवणूक झाली म्हणून गुरु वारी रात्री चारही आरोपी विरोधात गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात दाखल केला असून तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल.- उमेश पाटील, तपास अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे