शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वालीवमध्ये दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:01 IST

भोयदापाडा येथील घटना : कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथे राहणाऱ्या दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नेमका हा मृत्यू कशामुळे झाला, हे फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल आल्यावर कळणार आहे.

वसईच्या पूर्वेकडील भोयदापाडा येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या पटेल दाम्पत्याने कोणत्या तरी कारणावरून विष पिऊन आत्महत्या केल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ माजली आहे. कृष्णा पटेल (३२) आणि प्रभाती पटेल (३०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा असल्याचेही कळते. हे दोघेही घरामध्ये पडलेल्या अवस्थेत मंगळवारी आढळल्यावर त्यांना सर डी.एम. पेटिट रुग्णालयात उपचारासाठी नेले. वसई पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यावर वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहवाल आल्यावरच  कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

घरातच पडलेले आढळले कृष्णा आणि प्र‌भाती हे दाम्पत्य घरामध्ये पडलेल्या अवस्थेत मंगळवारी आढळल्यावर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वसईच्या महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटिट रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, प्रभाती हिचा उपचाराआधीच मृत्यू झाला, तर पती कृष्णा याला उपचारासाठी दाखल केले. त्याचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.