शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंडविणारी महिला अटकेत

By admin | Updated: July 24, 2016 04:00 IST

मोदी स्कीमच्या नावाखाली नालासोपाऱ्यातील ५० महिलांची आर्थिक फसवणूक केलप्रकरणी सविना युसुफ खान या महिलेला तुळींज पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हाखाली अटक केली आहे.

विरार : मोदी स्कीमच्या नावाखाली नालासोपाऱ्यातील ५० महिलांची आर्थिक फसवणूक केलप्रकरणी सविना युसुफ खान या महिलेला तुळींज पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हाखाली अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील नगिनदास पाडा येथील कोणार्क कॉम्प्लॅक्समध्ये राहणाऱ्या सविनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्कीमच्या नावाखाली ५० महिलांची फसवणूक केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने ‘मोदी स्कीम’ चालू केली असून त्यात पैसे गुंतवल्यास लाखो रुपयाचा फायदा होणार असल्याच्या भूलथापा मारून फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.चाळीस हजार भरले तर दोन महिन्यात दहा लाख, पंधरा हजार भरले तर दोन महिन्यात पाच लाख आणि पाच हजार भरले तर दोन महिन्यात एक लाख मिळतील अशा भुलथापा सविना देत होती. त्यामुळे अनेक महिलांनी सविनाकडे पैसे गुंतवले आहेत. दोन महिन्याचा कालावधी संपून आठ ते नऊ महिने झाले तरी पैसे मिळत नसल्यामुळे संतापलेल्या महिलांनी चौकशी केली तर अशी कोणतीही स्कीम नसल्याचे समोर आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांनी तुळींज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) सविना खान घरगुती इमिटेशन ज्वेलरीचे काम करते. यानिमित्ताने संपर्कात येणाऱ्या महिलांना मोदी स्किमची माहिती देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. कमी पैशात अवघ्या दोन महिन्यात लाखो रुपये मिळत असल्याने परिसरातील पन्नासच्या वर महिलांनी सविनाकडे पाच, दहा, आणि चाळीस हजाराची रक्कम गुंतविली आहे.