शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘मी वसईकर अभियान’ : वसईत भ्रष्ट पोलिसांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:33 IST

‘मी वसईकर अभियान’ : ११ कोटींच्या दफनभूमी घोटाळाप्रकरणी अनोखे आंदोलन

वसई : ११ कोटी रुपयांच्या दफनभूमीच्या कामात घोटाळा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना पाठिशी घालणाºया माणिकपूर पोलिसांना दैवत मानून ‘मी वसईकर अभियाना’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी वसईच्या रस्त्यावरून टाळ - वाजंत्रीच्या गजरात पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य अशी पालखी मिरवणूक काढीत एक अनोखे आंदोलन केले.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वसई - विरार शहर महापालिकेने केलेल्या या दफनभूमी कामाच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पालघर पोलीस अधीक्षक, वसई अप्पर पोलीस अधीक्षक, माणिकपूर पोलीस निरीक्षक आदींच्या नावाचा उदो उदो करीत, टाळ - वाजंत्री वाजवीत त्यांच्या नावाचा गजर केला. अंबाडी रोड ते वसई रोड स्टेशनच्या मुख्य रस्त्यावरून पोलीस प्रशासनाला देव देवता मानून त्यांच्या प्रतिमेची पालखीद्वारे भव्य मिरवणूक काढली.यावेळी पालघर पोलिसांच्या विरोधात हाय - हाय च्या घोषणा देत तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा खुर्ची खाली करा अशाही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या अनोख्या आंदोलनाविषयी बोलताना ‘मी वसईकर अभियान’चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी भ्रष्टाचाºयांना पाठिशी घालणारे पालघर पोलीस असा त्यांचा उपहासात्मक उल्लेख केला. या भव्य पालखी मिरवणुकीत ‘मी वसईकर अभियाना’चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, जेष्ठ वकील अशोक वर्मा, अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किसनदेव गुप्ता, माकृस रोजारिओ, रवी सिंग, मुकेश भट, विनायक नाईक, देवेश कुमार, रश्मी राव, लव जॉय डायस, आदी उपस्थित होते.उपोषण, धरणे करूनही दखल नाहीगुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ‘मी वसईकर’च्या कार्यकर्त्यांचे १६ जुलैपासून वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गाने उपोषण, धरणे आंदोलन सुरू आहे. याउलट गेल्या आठवड्यात या आंदोलकांचा तंबूच उखडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस तसेच महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला होता. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार