शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे ५९ लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:33 IST

मात्र नागरिकांची उदासिनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेने कोरोनाच्या काळात ठिकठिकाणी लावलेले हात धुण्याच्या केंद्रांचा वापर होत नसल्याने महानगरपालिकेचे ५९ लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. या केंद्रातील नळ चोरीला गेले असून गर्दुल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे. रात्री किंवा दुपारच्या सुमारास काही जण या ठिकाणी झोपतात. तर भाजीवाल्यांनीही त्या सेंटरवर कब्जा केला आहे.

कोरोना हा विषाणू हातावाटे नाकातोंडात जातो. त्यामुळे हात वारंवार धुण्याचा, सतत सॅनिटायझर लावण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला. वसई-विरार महापालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्ड वॉश बेसिन) बनविणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी लाखो रूपये खर्चून हॅण्ड वॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रु पये खर्च करण्यात आले.

मात्र नागरिकांची उदासिनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.महानगरपालिकेने शहरातील १७ ठिकाणी नागरिकांसाठी हॅण्ड वॉश सेंटर उभारले होते. मात्र त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्यांनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तेथे फिरकतदेखील नाही. घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. एका हॅण्डवॉश सेंटरसाठी साडेतीन लाख रुपये खर्च पालिकेने केला आहे. शहरात वसई येथील पापडी, पारनाका, रेंज आॅफिस, गावराई नाका, गोलानी नाका, अंबाडी रोड, सातिवली तर नालासोपाºयात ५ ठिकाणी आणि विरार येथे २ ठिकाणी असे एकूण १७ हॅण्डवॉश सेंटर असून पालिकेचा ५९ लाख ५० हजार रुपये खर्च पाण्यात गेला आहे.शहरात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली आहेत. नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या केंद्रातून हात धुवावेत. नंतर आम्ही या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग कायमस्वरूपी पाणपोईसाठी करणार आहोत. त्यामुळे पैसे वाया गेले असे म्हणता येणार नाही. - राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार