शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेने बजावल्या 299 गाळेधारकांना नोटिसा; उपायुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:50 IST

परस्पर भाड्याने दिलेल्यांचे करार हाेणार रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार महापालिकेने स्वयंरोजगाराला चालना मिळावी यासाठी पालिका क्षेत्रात व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती करून नाममात्र भाडेतत्त्वावर नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात आले होते. यातील काही गाळे नगर परिषद काळापासून आहेत. त्या गाळ्यांचे करार संपूनही पालिकेकडून नवे करार करण्यात आलेलेे नाहीत. तसेच अनेक गाळेधारकांनी अनेक वर्षांपासून हे नाममात्र शुल्कही भरलेले नाही. अशा २९९ गाळेधारकांस महापालिकेने कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. तर केवळ सात हजार २६० रुपयांची वसुली केली आहे.वसई विरार माहापालिकेतर्फे नऊ प्रभागांत ५२३ व्यावसायिक गाळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत. पण, पालिकेने या गाळ्यांकडे कधीही लक्ष दिले नाही. यामुळे अनेक वर्षांपासून या गाळ्यांचे मुदत करार संपूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर ज्या व्यक्तीला हे गाळे देण्यात आले, त्याच व्यक्तीने या ठिकाणी व्यवसाय करणे अपेक्षित असताना अनेकांनी हे गाळे बिनदिक्कत भाडेतत्त्वावर दिले आहेत. नुकतेच पालिकेने या गाळ्यांचे सर्वेक्षण करून रेडीरेकनरनुसार त्यांच्या मासिक भाड्यात वाढ केली आहे. पण, या भाडेवाढीला गाळेधारकांनी विरोध दर्शविल्याने पालिकेने ही प्रक्रिया थांबवली आहे.  इतरांना गाळे भाड्याने दिले आहेत, त्यांचे करार रद्द केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी दिली आहे.