शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’साठी सज्ज, जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 04:08 IST

Coronavirus : रविवारी घरातच बसून राहता यावे यासाठी महिला वर्गाने शनिवार सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गाठली होती.

- हितेन नाईकपालघर : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे इटली, चीन आदी देशात गेलेल्या बळींची संख्या पाहता आपल्या देशात या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी घरातच बसून राहता यावे यासाठी महिला वर्गाने शनिवार सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गाठली होती.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासोबतच आरोग्य अधिकारी-कर्मचारी, पोलीस मोठ्या हिमतीने काम करीत असून आपल्या जीवाची कुठलीही तमा न बाळगता हे लोक दिवस-रात्र एक करीत आहेत. मनाई आदेशाच्या विरोधात सुरुवातीला काही काळ लोकांचा तक्रारींचा सूर असला तरी या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागू नये म्हणून गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे, सहप्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विषाणूच्या पसरण्याची व्याप्ती वाढू नये, लोकांचा एकमेकांशी संपर्कवाढून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी एक दिवसीय कर्फ्यूचे आयोजन उद्या (रविवारी) सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत करीत कोणीही घराच्या बाहेर पडू नये या आवाहनाला गाव-पाड्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.व्हाट्स अ‍ॅप, फेसबुक आदी माध्यमातून रविवारी संपूर्ण दिवस घरीच राहण्याची भूमिका तरुण वर्गासह कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस स्वत:ला घरात बंदिस्त करताना खाण्या-पिण्याची, जेवणाची आदी वस्तू जमविण्यासाठी महिलांनी सकाळी बाजारपेठेत धाव घेत आपल्या वस्तूंची खरेदी केली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाचे बोर्ड गावागावात लावण्यात आले असून कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ग्रामस्थांनी आपल्या दारात उभे राहून पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसेच अत्यावश्यक सेवेत सहभागी असलेल्याच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून, थाळी अथवा अन्य वाद्य वाजविण्याचे आवाहन सरपंचच्या वतीने करण्यात आले आहे तर दुसरीकडे आपल्या गावात येणाऱ्या पर्यटकांना, फेरीवाले, बाहेर गावच्या व्यक्तीमार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत गाव बंदी घालण्यात आली आहे. अशी बाहेरून एखादी व्यक्ती गावात आल्यास विनंती पूर्वक त्यांना आपल्या घरी जाण्याची विनंती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानामुळे सर्वत्र वसई तालुक्यात जनता कर्फ्यू असणार आहे. यावेळी सातही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. जर कोणी रस्त्यावर दिसले तर त्याची चौकशी केली जाईल. अतिआवश्यक सेवा उघड्या असल्याने कोणी दवाखान्यात, हॉस्पिटल किंवा मेडिकल या ठिकाणी औषधोपचार करण्यासाठी जातील.- विजयकांत सागर(अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)कोरोना विषाणूची दहशत आज संपूर्ण जग उपभोगत आहे. अशावेळी आपल्या गावातील नागरिकांच्या स्वास्थ्याची जबाबदारी घेण्यासाठी हा प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे.- राकेश तरे, सरपंच मुरबे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस