शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

CoronaVirus News: वसई-विरार परिसरातील हॅण्डवॉश सेंटर पडली धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:06 IST

लाखोंचा खर्च पाण्यात; नळही गेले चोरीला, नागरिकांमध्ये नाराजी

नालासोपारा : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने सर्वत्र कडक निर्बंध लावले आहेत. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत आयुक्त गंगाथरन डी. यांनी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मनपाने पहिल्या लाटेच्या वेळी ५९ लाख ५० हजार रुपये खर्च करून सर्वसामान्य नागरिकांना हात धुण्यासाठी शहरांत अनेक ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली होती, मात्र ही सेंटर सध्या धूळखात पडले असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट वसई-विरारमध्ये सुरू झाली असून एप्रिल महिन्यात तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांना, दुकानदारांना, व्यापाऱ्यांना कोरोनाबाबत कडक निर्बंध लावले, पण मनपाचे १७ हॅण्डवॉश सेंटर अद्याप धूळखात पडल्याचे चित्र आहे. या केंद्रांतील नळ चोरीला गेले असून काही ठिकाणी गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला असून भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. वसई विरार महानगरपालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्ड वॉश बेसिन) बनविणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी हॅण्डवॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र नागरिकांची उदासीनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत. नागरिक त्याचा वापर करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. अविचाराने आणि घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.गेल्या वर्षी मनपाने कोरोनाकाळात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारले होते. मात्र हे सेंटर आता धूळखात पडले आहेत. लोकांना शहाणपण सुचवणारी मनपा याकडे कानाडोळा करत आहे. याबाबत  मनपा अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे. - शिरीष चव्हाण, माजी नगरसेवक, नालासोपारा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या