शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: वसई-विरारमध्ये ऑनलाइन नोंदणी करूनही वृद्धाला व्हॅक्सिन देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 07:01 IST

Corona Vaccination: ॲपचा घोळ; महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार

- मंगेश कराळेनालासोपारा : १० दिवसांपूर्वी नोंदणी करून ठरवून दिलेल्या वेळेत कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या एका ७८ वर्षीय वयोवृद्ध नागरिकाला पालिकेच्या आरोग्य विभागाने व्हॅक्सिन देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. नालासोपारा पूर्वेकडे राहणारे प्रेमसिंग सभापती (७८) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. सभापती यांनी शासनाच्या आरोग्य सेतू अंतर्गत कोरोना लस घेण्यासाठी १० दिवसांपूर्वी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्या वेळी त्यांना १ एप्रिलला लस घेण्याची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ते लस घेण्यासाठी पालिकेच्या नगीनदासपाडा येथील तुळींज हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी दाखवून लसीची मागणी केली असता, आम्ही ऑनलाइन नोंदणी मानत नाही. तुम्ही परवा सकाळी ७ वाजता येऊन नंबर लावा, असे तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगून व्हॅक्सिन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.सकाळपासून ताटकळत बसलेल्या सभापती यांनी अखेर डॉ. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, मी कामात आहे. काम आटोपल्यावर चौकशी करते, असे सांगून त्यांना टाळले. त्यामुळे सभापती यांनी पुन्हा लसीकरणाच्या ठिकाणी मागणी केली असता, आमचा स्टॉक संपला आहे, असे उत्तर त्यांना देण्यात आले. अखेर प्रेमसिंग सभापती निराश होऊन परतले घरी  लस न मिळाल्याने निराश होऊन प्रेमसिंग सभापती घरी परतले. यानंतर त्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी म्हणून शासनाकडून आवाहन आणि ऑनलाइन नोंदणी सुरू केली असताना प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विभागाकडून वेगळीच वागणूक दिली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लसीकरणासाठी १ एप्रिल ही तारीख देण्यात आली होती. त्यामुळे तुळींज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लस तर मिळाली नाहीच, उलट ऑनलाइन नोंदणी मानत नसल्याचे उत्तर देऊन पिटाळून लावले. - प्रेमसिंग सभापती, नागरिकऑनलाइन व्हॅक्सिन घेण्यासाठी असलेल्या ॲपचा घोळ आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना लस देणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही त्याची माहिती पाठवा, मी याची चौकशी करते. - डॉ. सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई महानगरपालिका.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस