शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

Corona Vaccination: जिल्ह्यातील 23 लसीकरण केंद्रे बंद; पालघरमधील लसीचा साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:04 IST

केंद्रीय समितीने दखल घेण्याची गरज

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांतील लसीचा साठा संपल्याने अखेर २३ लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. अजूनही लसीचा साठा मिळण्याबाबत कुठलेही संकेत मिळत नसल्याने जिल्ह्यात लसीकरण प्रक्रिया पूर्ण बंद पडण्याची परिस्थिती ओढवली आहे. याची गंभीर दखल केंद्रातून आलेल्या समितीने घेऊन तात्काळ लसपुरवठ्याबाबत पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. केंद्राकडून पुरेसा लसीचा साठा राज्याला मिळत नसल्याने लसीकरण मोहीम नाईलाजाने स्थगित करण्याची पाळी ओढवू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. कोरोनाला प्रतिबंध करणारी ही लस असल्याने लसीकरणाला वेग आला असताना अचानक केंद्र सरकारकडून लस मिळण्याच्या मागणीची पूर्तता केली जात नसल्याचे आरोप केले जात आहेत. आरोग्य संचालनालय, पुणे यांच्याकडे जिल्ह्यातून ८५ हजार लसीची मागणी करण्यात आली असून त्यांच्याकडून ठाणे आरोग्य विभागाकडे येऊन नंतर पालघर जिल्ह्याला साठा मिळणार आहे.१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिला डोस घेतल्यावर ४ आठवडे ते ६ आठवड्यात दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त होते. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात घेतलेल्या पहिल्या लसीच्या डोसनंतर दुसरा डोस एप्रिलच्या १० तारखेपर्यंत घेणे अपेक्षित असताना आता लसीचा साठा संपल्याने शरीरातील प्रतिकारक्षमता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला धोका निर्माण होण्याची भीती असल्याचे  एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता : बाधितांची संख्या ६ हजार ९२१जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ९२१ इतकी झाली आहे.  बाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी हॉस्पिटलमधील बेडची संख्या कमी पडत आहे. विक्रमगडमधील रिव्हेरा या कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या तक्रारीत अजूनही सुधारणा झाली नसल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या हॉस्पिटलमधील मोठे सिलेंडर ८ दिवसापासून संपले असून छोट्या सिलेंडरवर ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.बंद पडलेली केंद्रेवाडा ग्रामीण रुग्णालय, कासा उपजिल्हा रुग्णालय, भाताने, पारोळ, साखरशेत, निर्मळ, सातपाटी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेदांत हॉस्पिटल, लालबहादूर शास्त्री हॉल मनोर, वाणगाव ग्रामीण रुग्णालय, टॅप्स हॉस्पिटल, साईनित, चिन्मया हॉस्पिटल बोईसर, डॉ.ढवळे हॉस्पिटल पालघर, गुरुकृपा हॉस्पिटल वाडा तर वसई-विरार महापालिका अंतर्गत रिद्धी विनायक हॉस्पिटल, विजयालक्ष्मी हॉस्पिटल, बदर हॉस्पिटल नालासोपारा, कार्डिनल ग्रेशिअस हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल वसई, विजय वल्लभ हॉस्पिटल बोलींज, जीवदानी हॉस्पिटल, विरार(पूर्व), संजीवनी हॉस्पिटल विरार(प) आदी २३ हॉस्पिटलमधील लसीकरण साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस