शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा केला अवमान? जिल्हाधिकारी, जि. प.चे सीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी दोषी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:07 IST

हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या संबंधित व जबाबदार अधिका-यांना वकिलामार्फत हरित लवादाचा अवमान केल्याची नोटीस ३१ मे रोजी बजावली आहे.

बोईसर - हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या संबंधित व जबाबदार अधिका-यांना वकिलामार्फत हरित लवादाचा अवमान केल्याची नोटीस ३१ मे रोजी बजावली आहे.तारापूर एमआयडीसी मधून समुद्रात व इतर नाल्यावाटे खाडीत व समुद्रात जाणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी आणि पर्यावरणाच्या झालेल्या प्रचंड ºहासामुळे मच्छीमारांना व नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड होणारा त्रास त्यांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि त्या अनुषंगाने त्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये लवादाने दि. ९ सप्टें. २०१६ रोजी अंतरिम आदेश दिला होता त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पालघरच्या उपजिल्हाधिकारी यांच्यावर सोपविलेली होती परंतु फारशी अंमलबजावणी झाली नसल्याचे व त्यामुळे लवादाचा अवमान झाला असे अ. भा. मां.स.परिषदेचे म्हणणे आहे . त्यावर आता हे अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी हरित लवादाने हे दिले होते आदेशसमुद्रात सोडण्यात येणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे पर्यावरणाच्या दृष्टीने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहीत केलेल्या प्रमाणात प्रक्रिया करून शुद्ध केलेले असावे.पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य खाते, तहसिलदार, महिला बालकल्याण आणि मत्स्य विभाग इत्यादी विभागाच्या अधिकाºयांची एक संयुक्त कमिटी स्थापन करून तिने प्रदूषण बाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पर्यावरणाचा झालेला ºहास आणि मच्छिमारांच्या आरोग्यावर झालेले दुष्परीणाम या बाबत अहवाल सादर करावा.सर्व उद्योगांचा होणारा सांडपाण्याचा निचरा ४० टक्के कमी करावा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या अधिकाºयांनी ४० टक्के पाणी कपात होते कां यावर लक्ष ठेवावे.कंपन्यातून होणारा प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचा निचरा ठरविलेल्या मार्गानेच व्हावा, अन्यत्र होता कामा नये असे आढळल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या अधिकाºयांनी संबंधीत उद्योगावर कठोर कारवाई करावी असे अनेक निर्देश दिले होते परंतु दुर्दैवाने त्याची फारशी अंमलबजावणी संबंधीत अधिकाºयांसह उद्योगांनीही न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या पदाधिकाºयांनी काही अधिकाºयांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि लेखी तक्र ारीही केल्या परंतु फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी ९ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकारी, पालघर यांना इमेलद्वारे भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली परंतु काहीही हालचाल झाली नाही. अखेर अ. भा. मा. स. परिषदेने वकिल मिनाझ काकलीया यांच्या द्वारे लवादाच्या अवमानाची नोटिस दि. ३१ मे २०१८ रोजी पाठविली असून आता तरी न्याय मिळेल या प्रतीक्षेत परिषद आहे.पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून किनारपट्टी भागातील मच्छिमारांच्या आरोग्याशी खेळणाºया सर्व यंत्रणे विरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने मच्छिमारांच्या हितासाठी हा लढा शेवट पर्यंत लढण्याचा निश्चय केलेलाअसून आम्ही या लढ्यात निश्चितपणे यशस्वी होऊ याची खात्री आहे- नरेंद्र नाईक , याचिकाकर्ते वमाजी सरचिटणीस, अखिल भारतीयमांगेला समाज परिषद

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार