शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन, मोदी सरकारचा निषेध; कुठे बैलगाडी, तर कुठे बैलजोडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:55 IST

भाजपा प्रणित केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढविल्याचा व महागाईचा निषेध करण्यासाठी डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयावर घोडा गाडी, बैल गाडी मोर्चा माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

डहाणू : भाजपा प्रणित केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढविल्याचा व महागाईचा निषेध करण्यासाठी डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयावर घोडा गाडी, बैल गाडी मोर्चा माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.रेल्वे स्थानकापासून तहसील कार्यालयावर निघालेल्या घोडागाडी, बैलगाडी, मोर्चात तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, शहर अध्यक्ष मोइन शेख, अशोक माळी, महिला अध्यक्षा राजश्री अहिरे, कासीम मुछाले आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिष्टमंडळा तर्फे तहसीलदार राहुल सारंग याना निवेदन देण्यात आले, केंद्र सरकारने आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पेट्रोल, डिझेलचे भाव काँग्रेस राजवटी पेक्षा तिपटीने कमी असतांना सतत भाव कमी करण्याऐवजी मनमानीने भाववाढ करुन सामान्य माणसांचे कंबरडे मोडले असा आरोप राजेंद्र गावित यांनी करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. एकीकडे महागाई भडकलेली असतांना त्यात नोटाबंदीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीची भर पडल्याने जनतेचे हाल होत आहेत, अशी टीका झाली.