शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

गोंधळात झाला शिक्षक गुणगौरव सोहळा

By admin | Updated: October 20, 2015 23:35 IST

वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात आयोजिलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षक तसेच त्यांच्या नातेवाईकाचा

वाडा : वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात आयोजिलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षक तसेच त्यांच्या नातेवाईकाचा सभागृहात गोंधळ तर प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसून आले. या कार्यक्रमासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे उपस्थित होते. मात्र जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक वगळता तालुका पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार न दिल्याने संबंधितांनी नाराजी व्यक्त केली. मनिषा जाधव, रमेश शेलार, किसन सोनावणे, महेंद्र पवार, रामेश्वर पाटील, जनार्दन पाटील, रंजिता घागस, आकांक्षा हरड, संजय सांबरे, जगदीश जाधव, गुरूनाथ लहांगे, अर्जुन कोदे, भगवान मेघवाले, रवींद्र तरे आणि संतोष पाटील या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या स्वरा पाटील हिचा विष्णू सवरा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौंड, उप सभापती नंदकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते निलेश गंधे, जि. प. सदस्य भालचंद्र खोडके, किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, माधुरी पाटील, मेघना पाटील, शामा गायकर, अश्विनी शेळके, गटविकास अधिकारी निखिल ओसवाल, वाड्याचे सरपंच उमेश लोखंडे, उपसरपंच रोहन पाटील, मनसेचे गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)