शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेससह तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:11 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर, काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्यासह अन्य तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

हितेन नाईक  पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर, काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्यासह अन्य तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेसवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आल्याने, जिल्ह्यातील त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर घेतलेल्या पोटनिवडणुकीत, भाजपाकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून किरण गहला, तर अपक्ष शंकर बदाडे, संदीप जाधव असे सात उमेदवार रिंगणात होते. पालघर, बोईसर, विक्र मगड, डहाणू, नालासोपारा आणि वसई या सहा विधानसभा क्षेत्रात ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वैध झालेली ८ लाख ६९ हजार ९८५ मतांच्या (नोटा मते वगळून) आधारे, १ लाख ४४ हजार ९९८ मते आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी मिळविणे गरजेचे असताना ती त्यांना न मिळाल्याने, काँग्रेसचे दामोदर शिंगडा, माकपचे किरण गहला, दोन अपक्ष शंकर बदाडे, संदीप जाधव या चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे सहायक निवडणूक अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.