शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता, पालघर जिल्ह्यामध्ये १,३९७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 01:39 IST

पालघर जिल्ह्यामध्ये १,३९७ रुग्ण : सर्वाधिक कोरोनाबाधित वसई-विरारमध्ये

हितेन नाईक 

पालघर : जिल्ह्याने कोरोनाचा १३९७ चा टप्पा गाठला असून ४८ रुग्णांचा मृत्य झाला आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ११६८ बाधित व ४२ मृत्यू अशी सर्वाधिक बाधित संख्या आहे. मागील तीन महिन्यांपासून हा आकडा वाढतच चालला असताना निश्चिंत असलेल्या इतर सात तालुक्यांतील अनेक भागातही बधितांची संख्या वाढत चालल्याने ग्रामपंचायतीने तात्काळ काही कठोर निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.

मार्चच्या सुरुवातीलाच चीन, दुबई, अमेरिका आदी देशांत कोरोनामुळे नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी यंत्रणा उभी करण्यात शासनाला उशीर झाल्याने या प्रवाशांच्या आडून कोरोना रोगाचा शिरकाव देशात झाल्याचे बोलले जाते. कोरोनाचे रुग्ण देशात सापडू लागल्याने पालघर जिल्ह्यातही गर्दी जमतील असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात अथवा पुढे ढकलण्यात आले. जिल्ह्यात प्रथम वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासह अन्य ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे असलेले २० रुग्ण आढळल्यानंतर तात्काळ १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीत जिल्हाधिकाऱ्यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २०० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय तर ग्रामीण भागासाठी ८५ खाटांचे रुग्णालय अलगीकरणासाठी उभे करण्यात आले. तर विलगीकरणासाठी शहरी भागात २८ खाटांचे तर ग्रामीण भागात ४० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले.प्रथम २८ मार्चला वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात पाच रुग्ण तर उसरणी येथील एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर कोरोनाबाधितांची सुरू झालेली मालिका आज १ हजार ३९७ वर आणि ४८ रुग्णांच्या मृत्यूपर्यंत पोचली आहे. मागील ३ महिन्यांत वसई तालुक्यात हैदोस घालणाºया कोरोनाने आता अन्य सात तालुक्यांतील ग्रामीण भागात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती एवढी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली असताना काही बेपर्वा नागरिकांचा योग्य प्रतिसाद यंत्रणेला मिळत नसल्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यंत्रणेला यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.२५ मार्च रोजी डहाणू तालुक्यात २, पालघर १०, तलासरी २, वाडा १, वसई ग्रामीण १ आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ५ अशा २१ कोरोनाबधितांच्या जिल्ह्यात सुरू झालेल्या प्रवासात चढ-उताराच्या खेळात १९ एप्रिलला जिल्ह्याने शंभरी (१०३)चा पल्ला गाठला. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासह सफाळे, कासा, डहाणू, उसरणी, मासवण, काटाळे आदी भाग प्रथमच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पहिला लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. जिल्ह्यात उसरणी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची पहिली घटना घडल्यानंतर त्याच्या काही नातेवाईकांनाही बाधा झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांनी प्रवेशद्वारावर अडथळे निर्माण केले, तर काहींनी बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी घातली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटून अनेक नागरिकांनी घरात राहणे पसंद केले होते. दरम्यान परप्रांतीय मजूर आणि पोरबंदरहून जिल्ह्यात परतणाºया हजारो खलाशांच्या प्रश्नाचा अतिरिक्त ताण जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यांच्यावर पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अडसर निर्माण झाला.गावांचे स्वास्थ्य बिघडू लागले :मुंबई आदी शहरी भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृत्यूच्या घटना वाढू लागल्याने शहरी भागातील अनेक कुटुंबांना आपले गाव सुरक्षित वाटू लागले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, किनारपट्टीवरील गावात अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावाकडे येऊ लागली आहेत. त्यांना रोखण्याबाबत गावात दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर सर्व ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दुसरीकडे गावाकडून शहरी भागात नोकरीनिमित्ताने जाणाºया लोकांकडूनही गावात कोरोना पसरू लागल्याने गावचे स्वास्थ्य बिघडू लागले आहे. त्यामुळे गावांची डोकेदुखी वाढली आहे.२१ मे रोजी डहाणू, वाणगाव, बोईसर, तारापूर या भागांत १० बाधित रुग्णांची वाढ झाल्याने पुन्हा प्रतिबंधित क्षेत्राची घोषणा जिल्हा प्रशासनाला करावी लागली. अवघ्या ४ दिवसांत म्हणजे २३ मेपर्यंत तब्बल १२६ रुग्णांची भर पडल्याने एकूण ५३० बाधित रुग्ण व २० रुग्णांचा मृत्यू झाला. २७ मेला ६८२ बाधित आणि २५ मृत्यू, २८ मेला ७२६ बाधित, २९ मेला ७८६ बाधित आणि २७ मृत्यू, ३१ मेला ८४७ बाधित आणि २९ मृत्यू, २ जूनला ९६० बाधित आणि ३२ मृत्यू, ४ जूनला हजारांचा टप्पा (१०५९) गाठीत ३५ मृत्यू, ५ जूनला १,१४० बाधित ३८ मृत्यू, ७ जूनला १,२३३ बाधित ४० मृत्यू, तर ९ जून रोजी १,३०१ बाधित ४४ मृत्यू अशी साखळी वाढतच आहे.एप्रिल ते जून महिन्यादरम्यान बाधितांची वाढती साखळी१९ एप्रिललाबाधितांची शंभरी (१०३) गाठल्यानंतर २० दिवसांनी ८ मे रोजी द्विशतक (२०९) पार झाले.त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत त्रिशतकाचा (३१३)आकडा पार करीत १५ रुग्णांचा मृत्यू झाला.१९ मेरोजी ४०० चा टप्पा गाठताना वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र व वसई पूर्व या भागातच ३६९ बाधित व १४ मृत्यूझाले होते.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ‘रेड झोन’ घोषित करून अन्य७ तालुक्यांत‘नॉन रेड झोन’ क्षेत्र म्हणून घोषित केले.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार