शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 02:06 IST

लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे.

पालघर: लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडविल्याने त्यांच्यावर कांरवाईची मागणी कोकण विकास मंचचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील विक्र मगड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित कुंभारे हे काम पहात होते. त्यांना मतदारसंघातील कामे करण्यासाठी एका चालकासह गाडी पुरविण्यात येते. अशावेळी कुंभारे यांनी आपल्याला पुरविण्यात आलेल्या शासकीय वाहनांचा वापर शासकीय कामकाजात करणे अपेक्षित असताना आपल्या वाहनाचा खासगी वाहनाप्रमाणे वैयिक्तक स्वार्थापोटी दुरु पयोग करीत असल्याची तक्र ार सांबरे यांनी केला आहे.कुंभारे हे दररोज शासनाच्या गाड्या घेऊन त्यांच्या मूळ निवासी केंद्रावर न राहता वसई-विरार येथे रोज गाडी घेऊन जात होते. खाजगी कारणासाठी वापरलेल्या गाड्यांचे भाडे आणि इंधनाचा खर्च वसूल करावा अशी मागणी तक्र ारीत करण्यात आली आहे. सदर अधिकारी आदिवासी विभागात काम करत असताना, आदिवासी विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडमिशन, शिष्यवृत्ती व इतर अनेक लोकोपयोगी काम करण्याबाबत सातत्याने टाळाटाळ करीत असल्याच्या तक्र ारी ही करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :palghar-pcपालघर