शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा भरती गैरव्यवहारातील दोषींवर दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:31 IST

जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती.

- हितेन नाईकपालघर -  जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे येत्या आॅक्टोबर महिन्यात या प्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्यास सुरु वात झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सर्वसाधारण सभेत बुधवारी जाहीर केले.पालघर जिल्हा निर्मिती नंतर ठाणे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीच्या यादी मधील २८ कर्मचाºयांच्या नेमणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदे कडून घाईघाईने करण्यात आल्याचे निदर्शनास येताना ठाणे जिल्हापरिषदेने मात्र अनुकंपा तत्वाच्या भरती करणे टाळले होते. दि.२१ फेब्रुवारी २०१७ ला या भरतीचा आदेश काढताना ज्या मंजूर टिपणीचा संदर्भ देण्यात आला त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांची स्वाक्षरीच नसल्याने फक्त संबंधित विभागातील लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांनीच हा भरतीचा निर्णय घेतल्याचे भासवीत उच्चपदस्थ अधिकाºयांना वाचिवण्याचा डाव खेळला जात होता.या भरतीद्वारे २८ कर्मचाºयांच्या नेमणुका करताना मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब पाटील यांनी प्रथम सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी स्वत: चौकशी केली होती. परंतु कारवाईचे सत्र पुढे सरकले जात नसल्याने पुन्हा १२ जून च्या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजला. त्यामुळे प्रकल्प संचालक माणिक दिवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची एक चौकशी समिती नेमण्यास शासनाला भाग पडले होते.परंतु या गैरव्यवहाराचा अहवाल मात्र सादर केला जात नव्हता. दरम्यानच्या काळात निधी चौधरी यांची बदली मुंबई महानगर पालिकेत आणि या प्रकरणातील संशयाच्या घेºयात सापडलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांची बदली (अजूनही त्यांना नेमणूक दिलेली नाही) करण्यात आली होती.बुधवारच्या सर्वसाधारण सभेत या अहवालाचे वाचन होत सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचा ठराव पारित होईल अशी अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या बाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने उपस्थित पदाधिकारी, सदस्यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाला नमते घेत पुढच्या महिन्यापासून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिल्या नंतर सर्वसाधारण सभेतील वादळ काही अंशी शमले.अनुकंपा भरती प्रक्रि या पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी मी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडे एक समिती नेमण्याबाबत सांगितले असता त्यांनी ऐकले नव्हते.- सुरेखा थेतले,माजी अध्यक्षा, जि. प. पालघरया भरती प्रक्रि येतील गैरव्यवहाराला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि उप मुख्यकार्यकारी प्रकाश देवऋषी जबाबदार असून जो पर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या