शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू’

By admin | Updated: August 17, 2016 02:08 IST

पालघर जिल्हा निर्मिती होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत.

पालघर : पालघर जिल्हा निर्मिती होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. सागरी, नागरी, व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा आपला जिल्हा असल्यामुळे विकासकामे करतांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु या अडचणींवर नियोजनबध्द पध्दतीने मात करु न गेल्या दोन वर्षात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदु मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयाची शाश्वत व नियोजनबध्द विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री विष्णु सवरा यांनी सोमवारी केले.भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त विष्णु सवरा यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ-९ बिल्डिंग, बिडको नाका, पालघर येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजीकच्या काळात आपणांस लाभणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, यासाठी पालघर तालुक्यातील पालघर, कोळगाव, खारेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोंडे व शिरगाव या सात गावात उपलब्ध असलेली सुमारे ४४० हेक्टर शासकिय जमीन जिल्हा प्रशासकीय मुख्यालय विकिसत करण्यासाठी सिडकोकडे वर्ग करण्यात येणार आहे. सिडकोकडून सदर प्रकल्पाचे काम करण्यात येणार असून यासाठी सिडको यांना पालघर नवनगर विकास प्राधिकरण घोषित करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयाचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करणे अभिप्रेत आहे. या सर्व कामांच्या अनुषंगाने साधारणत: रु पये ३५०० कोटींची उलाढाल पालघरच्या क्षेत्रात होणार आहे. यातुन विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून पालघर जिल्हा मुख्यालयाबरोबरच पालघर शहराच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. जिल्हयात कौशल्य विकास योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग व इतर क्षेत्रांमध्ये तरु णांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बोईसर औद्योगिक परिसरातील काही प्रमुख कंपन्या तसेच उद्योजक यांच्याशी विचार विनिमय करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते आहे.या योजनेंतर्गत मातांना दिला जाणारा आहार बालकांसाठी अमृतच ठरणार आहे. राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे व मुलींचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारणे यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. बोईसर जवळील कांबळगाव येथील जागेवर एकलव्य क्रि डा प्रबोधिनी उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन विक्रीकरिता संबंधित ग्रामसभेचा ठराव घेण्याचा निर्णय माननीय राज्यपाल महोदयांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु केली असून सन २०१९ पर्यंत प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे स्वत:चे घर असेल यादृष्टीने देखील नियोजन केले असल्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व लोकसहभाग याच्या मदतीने जिल्ह्याच्या विकासासाठी एकित्रतपणे कटीबध्द राहूया असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.(वार्ताहर)