शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, पालघरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 05:45 IST

ठाकरेंकडून गावितांचा प्रचार : पालघरमध्ये विनापरवाना बॅनर लावल्याप्रकरणी सेनेला दणका

पालघर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे २ एप्रिल रोजी प्रचारासाठी आले असताना पालघर नगरपरिषद हद्दीत विनापरवाना प्रचार स्टेज, बॅनर, लावल्या बद्दल भाविक डिजिटल, पालघर सह अन्य लोकां विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी दोन एप्रिल रोजी पालघर मध्ये सेना प्रमुख उद्धव ठाकरे हे वसईचा दौरा आटपून येणार असल्याने पालघरच्या हुतात्मा स्तंभ जवळील रहदारीच्या ठिकाणीच स्टेज उभारण्यात आला होता. मात्र वसई, वरई, सफाळे, मासवन, माहीम असा दौरा आटोपून उद्धव ठाकरे यांना पालघरला पोचायला उशीर झाला. त्यामुळे रात्रीचे १० वाजून गेल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेत त्यांनी कुठलाही प्रचार न करता मी पुन्हा येईन असे कार्यकर्त्यांना सांगून ते निघून गेले.

पालघरच्या हुतात्मा स्तंभ जवळच बेकायदेशीररित्या उभारलेल्या स्टेजची कुठलीही परवानगी पालघर नगर परिषदेकडे घेण्यात आलेली नव्हती तसेच त्यांचे शहरात विविध ठिकाणी लावलेली पोस्टर्सची परवानगीही ही घेण्यात न आल्याने सेना शहर प्रमुख भुषण संखे, मे. भाविक डिजिटल पालघर, मे.एस.एम.अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग, बोरीवली, मुंबई यांनी आदर्श आचारसंहितेतील नियमानुसार भंग केला आहे. त्यांच्या विरूद्ध पालघर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद आहे.विनापरवाना हुतात्मा स्तंभ जवळच उभारलेल्या स्टेजची कुठलीही परवानगी पालघर नगर परिषदेकडे घेण्यात आलेली नव्हती तसेच, विविध ठिकाणी लावलेली पोस्टर्सची परवानगीही ही घेण्यात न आल्याने मालमत्ता विदृपीकरण प्रतिबंध अधिनियमातर्गत कारवाई करण्यात आली.वसई-विरारमध्ये बॅनरबाजी तक्रारींकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षच्विरार : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता सर्वत्र लघु करण्यात आली आहे. तरी देखील वसई विरारमध्ये काही ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर लावलेले दिसून येत आहेत. तसेच, पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आचार संहितेचे उलंघन होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.च्लोकसभेच्या निवडणुका टप्प्या टप्प्यात होणार असून आचारसंहितेच्या कळत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा राजकीय पक्षांना त्रास दायी ठरू शकतो. हे माहित असताना देखील नालासोपारा व विरार पूर्वेला काही ठिकाणी आचार संहितेचे उलंघन होत आहे. याकडे लक्ष वेधले आहे.च्आचारसंहिता लागल्या नंतर सर्व राजकीय पक्षांनी आप आपले बॅनर काढून टाकले व भिंतीवर असलेल्या त्यांच्या जाहिरातींचे चित्र देखील मिटवले. रोज या बाबत कारवाई होत असली तरी यावर तोस कारवाई करून गुन्हा दाखल केला जात नाही आहे. यामुळे राजकीय पक्षांचे फावले आहे.च्फक्त प्रचाराचे नाही तर अभिनंदन व शुभेच्छा देण्याकरीता देखील फलक लावले जात आहे. वसई विरार शहरात अनेक ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर जैसे थे असून काही ठिकाणी तर पक्षाच्या कार्यालयावरील, नगरसेवकाच्या कार्यालयावरील बॅनर पण जसे होते तसेच आहेत.च्या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे यांनी ‘‘महापालिकेचे लक्ष असून काही ठिकाणी चौकशी करायची राहिली असेल.’’ असे सांगितले. तर उपायुक्त रमेश मनाळे यांनी कारवार्स सुरु असुन पहिल्यांना ताकीद दिली जाते. मात्र, नंतर नक्कीच गुन्हे दाखल होतात असे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalghar-pcपालघरShiv Senaशिवसेना