शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

कंत्राटी कामगारांनी बंद पाडले कोकाकोलाचे काम; प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 01:37 IST

ठेकेदार बदलावरून सुरू आहे वाद, सेवा खंडित करण्यात कामगारांचा विरोध

वाडा : कोकाकोला कंपनीतील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने रद्द केला असून या ठेकेदारांच्या १३१ कामगारांना दुसऱ्या ठेक्यात टाकण्यात आले आहे. पहिल्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन पुन्हा नव्याने दुसऱ्या ठेकेदाराकडे काम करण्यास सुरुवात करावी, असे कंपनीचे म्हणणे आहे, तर पूर्वी केलेल्या कामाची सेवा खंडित न करता नवीन ठेकेदाराकडे काम करण्यास कामगार तयार आहेत. मात्र, कामगार व कंपनीचे एकमत होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन सुरू करून कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे.

तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत ''कोकाकोला''ही शीतपेयांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत शेकडो कामगार काम करीत आहेत. कंपनीत कायमस्वरूपी कामगार वगळता ३३० कंत्राटी कामगार आहेत. कंपनीत एकूण चार ठेकेदार होते. त्यातील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने १ नोव्हेंबरपासून रद्द केला आहे. रद्द केलेल्या दोन ठेकेदारांकडे १३१ कामगार आहेत. या कामगारांना उर्वरित दोन ठेकेदारांच्या ठेक्यात टाकण्यात आले आहे. मात्र, कंपनीने कामगारांना पूर्वीच्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन नवीन सुरुवात करण्यास सांगितले आहे. हे कंपनीचे धोरण कंत्राटी कामगारांना मान्य नसून पूर्वीची सेवा खंडित न करता नवीन ठेक्यात येण्यास कामगारांची तयारी आहे. कामगारांनी स्थानिक कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कंपनी व्यवस्थापक, उपकामगार आयुक्त यांच्याकडे याबाबत न्याय मागितला. मात्र, त्यांना कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी सोमवारी कुटुंबासह कंपनीच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू करून येण्याजाण्याचा मार्ग अडविल्याने कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे. दरम्यान, कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत गोरे यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कंत्राटी कामगार गेल्या १८-२० वर्षांपासून कंपनीत काम करीत आहेत. त्यांची पूर्वीची सेवा खंडित केल्यास त्यांच्या आताच्या वेतनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे एकही कामगार राजीनामा देणार नसून नव्याने नेमणूकपत्र स्वीकारणार नाहीत. न्याय मिळेपर्यंत कामगारांचे आंदोलन सुरू राहील. - राजेश सावंत, संयुक्त सचिव, स्थानिक कामगार संघ

कारखान्यात कंत्राटी कामगारांची संख्या उत्पादन गरजांच्या आधारे वेगवेगळी असते. जी हंगामी आणि आमच्या उत्पादकांच्या मागणीशी थेट जोडलेला आहे. या विषयावर लक्ष देण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत.  आम्ही लवकरच हा विषय निकाली काढू. - श्रेयस शर्मा प्रसिद्धी अधिकारी, कोकाकोला कंपनी