शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लिपीक परीक्षा नव्याने नाही

By admin | Updated: October 22, 2015 00:07 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक तसेच टंकलेखकपदांच्या परीक्षेत दुसऱ्यांदा मोबाइलद्वारे कॉपी झाल्याचे निष्पन्न झाले.

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक तसेच टंकलेखकपदांच्या परीक्षेत दुसऱ्यांदा मोबाइलद्वारे कॉपी झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची सायबर क्राइम ब्रँचकडून तपासणी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, ही ओबीसी हक्क परिषदेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक व टंकलेखकपदांच्या १३४ जागांसाठी प्रथम ४ आॅक्टोबरला झालेल्या परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द करून पुन्हा १८ आॅक्टोबर रोजी फेरपरीक्षा घेतली. या परीक्षेमध्येही दोन परीक्षार्थ्यांजवळ मोबाइल सापडल्याने तर दोन विद्यार्थ्यांजवळ कॉपी सापडल्याने एकूण चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कमकुवत प्रशासकीय व्यवस्थेचे हे उदाहरण असल्याची टीका हक्क परिषदेने केली होती. दोन्ही परीक्षांदरम्यान झालेल्या पेपरफुटी प्रकरणातील परीक्षार्थी आरोपी हे पालघर जिल्हाबाह्य असल्याचे ठळकपणे दर्शवित पालघर जिल्ह्यातील कार्यालय भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनाच स्थान द्यावे, या मागणीवरही हक्क परिषद ठाम असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)दोषींवर कारवाई करातलाठी भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील उमेदवारांनी परीक्षा दिली असली तरी न्यायालयाच्या आदेशानुसार भरती प्रक्रिया राबविली जावी, दोषींवर कारवाई झाल्याखेरीज नवीन जिल्हा भरती प्रक्रिया करू नये, नवीन भरती प्रक्रियेत स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, पेपरफुटी प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन रोहित पाटील, अ‍ॅड. विलास पाटील, अभय पावडे इ.नी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.ओबीसी परिषदेची मागणीओबीसी हक्क परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली. ही मागणी फेटाळत दोन्ही परीक्षार्थ्यांकडील मोबाइल आणि कॉपी या परीक्षेच्या सुरुवातीलाच सापडल्याचे सांगून पेपरफुटी झालीच नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगितले. तसेच यापुढे भरती प्रक्रियेनंतरही रुजू झालेला परीक्षार्थी हा या पेपरफुटी रॅकेटमध्ये दोषी आढळल्यास त्याची भरती रद्द करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.