शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:41 IST

वसई तालुक्यात स्वच्छतेसाठी मुख्य परिसरात, महामार्गावर, स्थानकाबाहेरील परिसरात क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते.

विरार : शहरात सर्वत्र स्वच्छता असावी तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी वसई - विरार महानगरपालिकेतर्फे गेल्या वर्षी स्वच्छतेसाठी क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते. वर्षभरात या पथकाने संपूर्ण वसई तालुक्यात कारवाई केली आहे. मात्र, कारवाई सुरू असतानाही शहरात काही ठिकाणी अस्वच्छता तशीच आहे.दरम्यान, काही महिन्यांपासून स्थानकाबाहेर अथवा शहरात क्लीन - अप बीट मार्शल दिसत नसल्याने नागरिकांकडून बिनधास्तपणे अस्वच्छता पसरवली जात आहे. वसई तालुक्यात स्वच्छतेसाठी मुख्य परिसरात, महामार्गावर, स्थानकाबाहेरील परिसरात क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते. पहिल्या वर्षी या मार्शल्सनी चांगले काम केले असले तरी काही ठिकाणी अजूनही अस्वच्छता आहे.गंमत म्हणजे, सर्वत्र बीट मार्शलची उपस्थिती असतानाही स्थानकाबाहेर आणि मुख्य रस्त्यांवर अस्वच्छतेचे प्रमाण वाढते आहे. बीट मार्शल केवळ दुपारच्या वेळात स्थानकाबाहेरील परिसरात उपलब्ध असतात. तर काही ठिकाणी क्लीन - अप बीट मार्शलची सुविधा नसल्याने त्या परिसरांमध्ये मोेठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. हे बीट मार्शल नेमक्या वेळेतच हजर असल्याने इतर वेळी नागरिक कचरा तसेच घाण पसरवत असतात.सुटीच्या वेळेस वसई - विरारमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे यावेळी बीट मार्शल्सची सर्वाधिक गरज असते. मात्र, ते कुठेच दिसत नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. क्लीन - अप बीट मार्शल कडून चांगलीच कारवाई झाली असली तरी शहरात सध्या क्लीन - अप बीट मार्शलचा वावर कमी झाला असल्याचे दिसत आहे. हे टाळण्यासाठी शहरात क्लीन अप मार्शल असावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.पहिल्याच वर्षात बीट मार्शल पथकाने चांगलीच कारवाई केलेली आहे. अस्वच्छता पसरत असली तरी त्यावर कारवाई देखील सतत सुरु आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.- स्वच्छता विभाग अधिकारी,वसंत मुकणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार