शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:50 IST

वाडा तालुक्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण विभागाविरोधात धरणे

वाडा : तालुक्यातील मानिवली येथील प्रल्हाद शिक्षण मंडळाच्या बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालयाच्या जवळपास ५४ विद्यार्थ्यांच्या शालांत परीक्षेचा निकाल अद्याप न मिळाल्याने त्यांचे शैक्षणकि नुकसान होत असून वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी तसेच पालकांना भेडसावते आहे. हा निकाल त्वरित देण्याची मागणी त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. या मागणीसाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील मानिवली येथे बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालय असून २०१६ - १७ मध्ये या शाळेची स्थापना झाली. दरवर्षी या विद्यालयातून नववी आणि दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, या शाळेस शासकीय मान्यता नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमधून परीक्षेस बसवले जाते. यंदाही ५४ विद्यार्थ्यांना विक्र मगड तालुक्यातील साखरे येथील विद्यालयातून परिक्षेस बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क संस्थेकडे जमा देखील केले होते. मात्र संस्था चालकांनी हे शुल्क परिक्षा मंडळाकडे न भरल्याने त्यांचे निकाल रोखण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी पूनम बरफ, वैष्णवी वाघ आणि पालकांनी केला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी धरणे आंदोलन केले.संस्थेने परीक्षा मंडळाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने त्यांचा निकाल राखून ठेवल्याचे संस्थेचे विश्वस्त संतोष साठे यांच्याकडून मला समजले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून त्यांचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाईल. - जयवंत खोत,गटशिक्षणाधिकारी, वाडा पंचायत समिती शिक्षण विभागविद्यार्थ्यांची अतीविलंब फी ४ लाख ६१ हजार न भरल्याने बोर्डाने निकाल रोखून धरले आहेत. संस्थेने शाळा बंद केली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येत्या पंधरा दिवसांत निकाल प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.- संतोष साठे, विश्वस्त, प्रल्हाद शिक्षण मंडळ

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल