शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:48 IST

कमाल तापमान राहणार सरासरीपेक्षा जास्त : शेतकऱ्यांनी स्वतःसह पशुधनाची काळजी घेण्याची गरज, कृषी हवामान शास्त्रज्ञांचा सल्ला

अनिरुद्ध पाटील  बोर्डी : भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील चार आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे उष्णता अधिक वाढणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली. दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी तापमान ३७.२ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले.

तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी शक्यतो संध्याकाळी द्यावे. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशापासून आंब्याच्या बुंध्याचे संरक्षण करण्यासाठी खोडावर बोर्डोपेस्ट लावावी तसेच झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपई यांसारख्या फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी बॅगिंग किंवा स्कर्टिंग करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता त्यांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. कुक्कुटपालन शेडच्या बाजूने बारदाने लावून त्यावर सतत पाणी शिंपडावे तसेच छतावर गवत पसरावे.  त्यामुळे आतील तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात