शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तूंचे दिवाळीवरही वर्चस्व; फॅन्सी दिवे आणि फ्री हॅण्ड रांगोळीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:19 IST

दिवाळीचा सण गोडधोडाचा असला तरी कपड्यापासून फटाके, रोषणाई आणि शोभेच्या वस्तुंच्या खरेदी केडे ग्राहकांचा मोठ असतो. हेच हेरून चिनी व्यावसाईकांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात उतरवला

- राहुल वाडेकर।विक्रमगड : दिवाळीचा सण गोडधोडाचा असला तरी कपड्यापासून फटाके, रोषणाई आणि शोभेच्या वस्तुंच्या खरेदी केडे ग्राहकांचा मोठ असतो. हेच हेरून चिनी व्यावसाईकांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात उतरवला असून ग्रामिण भागातील ग्राहकांचा कल हा स्वस्त माल खरेदीकडे दिसून येत आहे. एकंदरच किरकोळ व्यापारात मेड इन चायनाचा बोलबाला असून मेक इन इंडियाची मोहीम फक्त सोशल मिडियावरच दिसून येत आहे.महागाई वाढली असली तरी खरेदीदांरामध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही़ दिवाळीसाठी गोड-धोड, फराळ, मिठाई, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळया, दिव्यांनाही दरवर्षीप्रमाणे मोठी मागणी आहे. पूर्वी दिवाळीत पारंपारीक आकाशकंदील दिसायचे, मात्र गेल्या काही वर्षापासून वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांची चलती पहायला मिळाली. या वर्षी तर खास चिनी वस्तंूबरोबर चिनी आकाशकंदीलांनीही बाजारपेठा सजल्या आहेत. कमी किंमत आणि आकर्षक असे हे आकशकंदिल ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.१५० ते १००० रुपयांपर्यत त्यांचे दर आहेत़ परंपरा जपणारे प्लॉस्टीक आणि कागदी आकाशकंदीलांना जास्त पसंती आहे़ देवदेवता, विश्वचषक, कार्टून, कमळ, गोल सिलेंडर, अंडाकृती, चायना बलून, फुलपाखरे अशा विविध आकारांत ती उपलब्ध आहेत़ वारली पेटिंगची कलाकुसर केलेले आकाशकंदीलही बाजारात दिसत आहेत़ दरम्यान, दिवाळीसाठी असलेल्या वस्तूंचे भाव २० टक्कांनी वाढलेल आहेत़ मात्र, त्याचा बाजारातील खरेदीवर विशेष परिणाम दिसून येत नाही.फॅन्सी दिवे आणि फ्री हॅण्ड रांगोळीकडे कलचिनी आकाशकंदीलासोबत तोरणांनीही बाजार सजले आहे़त. आकर्षक कलाकृती आणि सामान्यांना परवडतील अशा दरातील तोरणे उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल त्याकडे आहे़ पाचशेच्या आत त्याचा किंमत आहे़त. पणत्यामध्ये साधे दिवे, फॅन्सी दिवे, स्टॅड असलेले सजावट केलेल्या पणत्या, पणत्यांची माळ असे विविध आकारातील पणत्या ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत़विविध रंगाचे आणि रांगोळीमिश्रीत रंगाची पाकिटे १० ते २० रुपये पासून उपलब्ध आहेत़ पारंपारीक रांगोळी सोबतच आता संस्कारभरतीची, धान्यांची, फुलांची, पाण्यावरची व फ्री हॅड रांगोळीही काढली जाते़ चाळणीच्या जाळीवर विविध डिझाईन असलेल्या रांगोळीचे छापदेखील बाजारात उपलब्ध आहेत.

टॅग्स :diwaliदिवाळी