शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

चायनिज मांजामुळे जातो अनेक निष्पाप पक्ष्यांचा हकनाक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:12 IST

प्राणिमित्र संस्थांकडून आवाहन

अनिरुद्ध पाटीलबोर्डी :  मकरसंक्रांतीला तिळगुळाप्रमाणेच पतंगबाजीला विशेष महत्त्व आहे. मोकळी मैदाने, घराची गच्ची, समुद्रकिनारे आदी ठिकाणाहून पतंग उडविले जातात. आकाशात विविध आकार आणि रंगातील पतंगांचा खेळ मनाला आनंद देऊन जातो. मात्र पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या मांझ्यामुळे आकाशात स्वच्छंदी विहार करणाऱ्या पक्ष्यांना इजा पोहचून नाहक जीव गमवावा लागतो. या कालावधीत जिल्ह्यातील जखमी पक्ष्यांची संख्या मागील काही वर्षात घट झाली आहे. ही सकारात्मकता दाखवून पतंगबाजीला आवर घालण्याचे आवाहन वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनने (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) केले आहे.

पर्यावरण तसेच जैवसाखळीत पक्षी महत्त्वपूर्ण भूमिका वाजवतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागात याबाबत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यामुळे मागील दोन वर्षात हे प्रमाण घटले आहे.गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. ते शेजारील राज्य असले तरी जिल्हावासीयांनी पक्ष्यांच्या जीवितासाठी आपल्या संकल्पापासून विचलित होऊ नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती केली जात असल्याची माहिती या प्राणीमित्र संस्थेने दिली. मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटून सण साजरा करा, पतंगबाजीला आळा घालून पक्षीमित्र बना, असे आवाहन करण्यात येत आहे. 

मांजामुळे पक्षी मृत्युमुखीपतंगबाजी करताना हौशी नागरिकांची मौजमजा होत असली तरी चायनिज मांज्यामुळे पशू-पक्षी मात्र हकनाक आपल्या जीवाला मुकत आहेत. अशा अनेक घटना शहरांत घडत आहेत. पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा केली जात असली तरी पोलीस तरी कुठे कुठे पाहणार हा प्रश्नच आहे. 

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी पतंगबाजी लक्षात घेता पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन भित्तिचित्रे, फलक आणि स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पक्षिप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आतापासूनच करताना दिसत आहेत. 

चायनिज मांजा विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई पतंग उडवणे हा मनोरंजनात्मक खेळ असला, तरी अनेक ठिकाणी पतंगासाठी मांजाचा वापर केला जातो. मांजा दोऱ्यात अडकून शहरासह अन्य ठिकाणी जीवघेणे अपघात घडले आहेत. चायनीज मांजा पशू, पक्षी आणि मानवी जीवनास घातक ठरत असल्यामुळेराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मांजा उत्पादन, साठा,विक्री आणि खरेदीवर बंदी घातलेली असून दंडात्मक कडक कारवाई करण्याचेही आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. 

पतंगाची दोरी झाडाला गुंडाळली जाऊन, त्यामध्ये पक्षी अडकून अपघात घडतात. संस्थेच्या जनजागृतीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.           - धवल कंसारा,        मानद वन्यजीव रक्षक, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार