शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

प्रशासनाच्या निर्णयामुळे सुखावले चिकू बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:59 IST

चिकू निर्यातीचा मार्ग मोकळा

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : चिकू फळांची तोडणी ते निर्यात हे काम सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालते. कृषी उत्पादनांचा समावेश अत्यावश्यक सेवेत असला तरी नियमांमुळे फळे बाजारात पाठविणे अशक्य होते. मात्र डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बागायतदारांच्या भावना समजून घेऊन कामकाजाला परवानगी दिली. त्यामुळे चिकू फळाचा निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रतिदिन चाळीस लाखांचे नुकसान टळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.चिकू फळाच्या प्रत्येक फळाची झाडावर चढून तोडणी केल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून, वर्गवारी केल्यानंतर पॅकेजिंग केले जाते. त्यानंतर वाहनात भरून त्याची निर्यात केली जाते. परंतु फळांची तोडणी आणि धुण्याची प्रक्रिया करण्यासाठी संध्याकाळ होते. शिवाय सायंकाळी ६ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वर्गवारी तसेच पॅकेजिंगचे काम चालते. मात्र ‘ब्रेक द चेन’ मोहिमेनुसार रात्री ८ ते सकाळी ७ वाजता जमावबंदीचा सामना करावा लागतो. शिवाय सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे चिकू निर्यातीला अडथळा निर्माण झाला होता. डहाणू आणि तलासरी तालुक्यातून प्रतिदिन २२० ते २३० टन उत्पादन निघते. त्यामुळे बागायतदारांचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले असते.ही अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर चिकू उत्पादक, मजूर, वाहतूकदार यांना मोठा आर्थिक फटका बसला असता. याबाबत बोर्डीतील चिकू बागायतदार प्रीत पाटील यांनी तत्काळ डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना कल्पना दिली. कोविड नियमांचे पालन करून सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना मित्तल यांनी केली, मात्र चिकू तोडणी ते पॅकेजिंगनंतर वाहनातून किंवा डहाणू रोड रेल्वेस्थानकातील कृषी स्पेशल रेल्वे गाडीच्या डब्यात चिकू फळांचे बॉक्स ठेवण्यापर्यंतची माहिती सविस्तरपणे अधिकाऱ्यांना पटवून देण्यात प्रीत यशस्वी ठरले. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर मित्तल यांनी बागायतदारांना परवानगी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंमध्ये शेतमालाचा समावेश असला तरी चिकूची तोडणी ते पॅकेजिंगनंतर निर्यातीसाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत काम चालते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे अंतर राखले जाईलच असे नव्हे, मात्र या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझिंग इ.नियमाचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय खऱ्या अर्थाने चिकू उत्पादकांसाठी दिलासादायक ठरला आहे.        - प्रीत पाटील,                चिकू बागायतदार, बोर्डी