शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:18 IST

वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे

बोईसर : वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे याचे मोजमाप करण्यासाठी तारापूर एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती तसेच अन्य दोन ठिकाणी सुरु केलेली स्टेशन मागील अडीच वर्षापासून बंद पडून अक्षरश: धूळ खात पडली आहेतारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे. एस. डब्ल्यू. स्टील लि (जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्यानंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र.नि. मंडळाकडे येताच मंडळाने प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन एमआयडीसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे आदेश जे.एस.डब्ल्यू. स्टील या उद्योग समूहाला दिल्यानंतर २०१२ साली ३ स्टेशन सुरु करण्यात आली होती.तारापूरला कोळसा व इंधनाच्या वापरा बरोबरच रासानिक कारखान्यातून बाहेर पडणारे वेगवेगळे धूर यामुळे वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरती वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन फेब्रुवारी २०१७ पासून बंद पडले आहे. ते पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात या महिन्यात (जुलै २०१९) एक बैठक होऊन बंद पडलेली तिन्ही स्टेशन जे.एस.डब्ल्यू. स्टीलने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. मात्र सप्टेंबर २०१८ ला म.प्र.नि.मंडळाच्या ठाणे व पालघर विभागाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांनी लवकरच बंद असलेली स्टेशन्स जे.एस.डब्ल्यू. स्टील किंवा एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येतील आणि या दोन्ही माध्यमातून सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र.नि.मंडळ चालवेल, असे लोकमतला सांगितले होते. त्यामुळे आता कागदी घोडे न नाचवता ठोस कृति करावी, अशी मागणी आहे.>आता कोण चालविणार?जेएसडब्ल्यू स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन बंद होताच हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन झाली बंद. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे.एस.डब्ल्यू.स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन डिसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत गेले. त्यामुळे आता हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन चालविण्याची जबाबदारी जबाबदारी म.प्र.नि.मंडळाने घेणे गरजेचे होते.>हवा प्रदूषणाचे भीषण वास्तवजागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात दरवर्षी प्रदूषणाने सुमारे ७० लाख लोक अकाली मृत्यू पावतात. तारापूर मध्येही हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचविते आहे. प्रदूषण स्टॅण्डर्ड पॅरामिटरच्या बाहेर कधी कधी गेले हे यावरून समजत होते.>यामुळे होते प्रदूषणकारखान्यांमधून बाहेर पडणारे घातक वायू , विविध रासायनिक कारखान्याचा धूर वाहनांच्या धुरामधील प्रदूषित वायू तर धूर, धूलिकण, धूळ किंवा इतर तरंगत राहणारे अतिसूक्ष्म कण. वाहनांच्या धुरातूनही हे कण बाहेर पडतात.>जेएसडब्ल्यू स्टील या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीही करून घेतली असून लवकरात लवकर ही स्टेशन्स कार्यान्वित करण्यात येईल.- मनीष होळकर,उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १