शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बनावट पासपोर्ट व व्हिसाद्वारे १५ राज्यांतील लोकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:38 IST

पालघर एटीएसकडून एकास अटक । २२ मे पर्यंत पोलीस कोठडी, १५ राज्यांतील पोलिसांना हवा असलेला आरोपी

नालासोपारा : आखाती देशात नोकरी देतो, असे सांगून बनावट व्हिसा, पासपोर्ट बनवून सुमारे १५ राज्यांतील लोकांची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात पालघर एटीएसला यश आले आहे. उबेद अली अकबर शेख (४३) असे आरोपीचे नाव असून, गेल्या दीड महिन्यांपासून दहशतवाद विरोधी पथक त्याच्या मागावर होते. त्याला शुक्र वारी कामाठीपुरा येथून अटक करण्यात आली असून केले आहे. नालासोपारा पोलिसांनी वसई न्यायालयात शनिवारी उबेद याला हजर केल्यावर २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना तुम्हाला परदेशात पाठवितो, असे आमिष दाखवून, उबेद अली अकबर शेख (४३) हा त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना बनावट पासपोर्ट, व्हिसा बनवून द्यायचा. त्याने दिलेली कागदपत्रे हुबेहूब खºया व्हिसा आणि पासपोर्टसारखी असल्याने कोणालाच याचा संशय येत नव्हता. एअरपोर्टवर गेल्यानंतर आपल्याकडे असलेला व्हिसा आणि पासपोर्ट बनावट असल्याचे निदर्शनास येत असे. अशा प्रकारे उबेदने मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, लखनौ, हैद्राबाद, अहमदाबाद, इलाहाबाद, केरळ, दार्जिलिंग, बेळगाव, बेंगलोर, इंदोर, भोपाळ, बिहार आदी राज्यांतील हजारो लोकांची फसवणूक केली आहे. या सर्व राज्यांतील पोलीस त्याच्या मागावर होते.

उबेद शेख हा विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी तेथे सापळा रचला. मात्र, त्या आधीच उबेद शेख तेथून निघून गेला, पण त्याचा एक साथीदार त्यांच्या हाती लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उबेदने मीरा रोड येथे आॅफिस थाटले होते. मात्र, तेथेही तो नव्हता.

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, चंद्रकांत ढाणे, प्रकाश कदम, तुरकर, लोहार, सचिन पाटील, सुभाष आव्हाड, जगदीश गोवारी, संतोष निकोळे, तुषार माळी, शुभम ठाकूर, वैशाली कोळेकर यांच्या टीमने तपास सुरू ठेवला. फसवणूक करणारा उबेद शेख हा एकटा नसून, त्याचे आणखी आठ सहकारी आहेत. यांचा प्रमुख उस्मान शेख याला गेल्या वर्षीच अटक करण्यात आली होती.

थोरल्याचा वारसा लहान भावाने आणि मुलाने चालविला...गेल्या वर्षी अटक झालेला उस्मान शेख हा उबेद याचा सख्खा काका असून, त्याचे वडील अकबर शेखसुद्धा हेच काम करायचे. हे तिघे मिळून हजारो जणांना परदेशात नोकरीला जाण्यासाठी बनावट पासपोर्ट आणि व्हिसा बनवायचे. या त्रिकुटाने आतापर्यंत हजारो लोकांना फसविले आहे. मोठा भाऊ अकबर याचा वारसा लहान भाऊ उस्मान याने सुरू ठेवला व त्याला अटक झाल्यानंतर, अकबराचा मुलगा उबेद याने हा वारसा सुरू ठेवला. 

आतापर्यंत अनेकांना उबेद याने फसविले. अनेक राज्यांतून तो फरार होता. जिकडे जाईल तिकडे नावे बदलून तो राहायचा. खबºयाकडून माहिती मिळाल्यानंतर उबेद याला अटक केली. त्याचे अजून साथीदार फरार आहे.- मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, एटीएस, पालघर.

टॅग्स :fraudधोकेबाजी