- जान्हवी मोर्ये, ठाणेआपल्या बाप्पांची आरास आपल्याला स्वस्त आणि मस्त करता यावी, याकरिता अनेक जण स्वत: मखर तयार करतात. त्यामुळे बाजारात तयार मखरांपेक्षा घरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना जास्त मागणी आहे. अशी मखरे रंगविण्यासाठी यंदा मेटॅलिक कलर स्प्रे बाजारात आहेत. स्वत: तयार केलेल्या मखरांची मजा औरच असल्यामुळे या सुट्या साहित्याची बाजारपेठ तेजीत आहे. अशा रितीने बनविलेल्या मखरामुळे तयार मखरांच्या तुलनेत ६० टक्के बचत साधता येते. विक्रे ते शेखर जोशी यांनी सांगितले की, बाप्पांची आरास आकर्षक दिसावी म्हणून पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वॉटर कलरची जागा आता मेटॅलिक व फ्लोरोसेंट कलरने घेतली आहे. त्यांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. मखरामधील गोल्ड व कॉपर कलरला भक्त अधिक पसंती देत आहेत. मॅजिक, कॅमलीन यासारख्या कंपन्यांच्या स्प्रे गन्स कलर देण्यासाठी मिळतात. फ्लोनुसार त्यांचा दर्जा ठरतो. त्यांच्या किमती ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे पाच-सहा जण एकत्र येऊन या गनची खरेदी करून बचत साधतात. सजावटीच्या सुट्या भागात बरीच विविधता आहे. यंदाच्या वर्षी सुट्या भागाच्या किमतीत भाववाढ नाही. एक फुटापासून बारा फुटांपर्यंत मखरे तयार करता येऊ शकतात. त्यासाठी बाजारात सुटे भाग विविध प्रकारांत मिळतात. त्यात कमान, पिलर, कळस, बॅकग्राउंड, बॉर्डरपट्टी, आठ वाद्ये वाजविणारा त्रिशूल हातात धरलेला उंदीर, गणपतीचे फेटे, छत्र्या, लामणदिवा, हत्ती, मोर, घंटा रिंग डिझाइन, मोदक, पुष्पवृष्टी करणारी महिला असे विविध साहित्य आहे. काय आहेत दर सुट्या भागांचे...स्प्रे कलर- २२५ रु .फ्लॉवर एम्बॉस- एक शीट ३० रु लेटर एम्बॉस- एक शीट २५ रु .एम्बॉस प्रिंट- एक शीट ३० रु .फ्लोरोसेंट पेपर- १० रु. शीटबाटीक पेपर- २० रु. शीटवेलप्रिंट- ५० रु. शीटसुट्या साहित्यांचे दर,पिलर- १ ते १२ फुटांपर्यंत - २५ पासून ३०० रु.पर्यंत ,घंटा- ६० पासून २५० रु.पर्यंत , सुस्वागतम् महिला १२० ते २००, उंदीर -१५० ते ३०० रु. (जोडी) , बॅक ग्राउंड- १ शीट साईजप्रमाणे (४० ते १५०),बॉर्डर पट्टी- १० पासून १५० रु.पर्यंत ,हत्ती- ९० ते २०० रु. मोर- १०० ते २०० रुपये ,अष्टविनायक चित्राची पट्टी- ६० रु.,थर्माकोलची फुले- ५ रु. ते १० रु.पर्यंत ,थर्माकोलमधील ओम व स्वस्तिक - ५० रु.
स्वत:च साकारा स्वस्त आणि मस्त मखर
By admin | Updated: September 16, 2015 11:53 IST