शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

चार शाळांविरोधात गुन्हा दाखल, संस्थाचालकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:39 IST

शिक्षण विभाग आदेशाचा अवमान : संस्थाचालकांचे धाबे दणाणले

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार वसई पूर्वेकडील विभागातील एकूण चार शाळांच्या संस्था चालकांना गटशिक्षणाधिकारी यांनी नोटीस बजावली होती, पण या संस्था शिक्षण विभागाच्या आदेशाचा अपमान केला म्हणून वालीव पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अनधिकृत शाळा आणि शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वीही अनेक शाळांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसई पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी माधवी चेतन तांडेल (४१) यांनी पालघर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार २२ मे २०१९ अन्वये पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना शाळा बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले असतानाही वसई पूर्वेकडील गोखिवरे, गावराईपाडा येथील प्रेम बालिका योगेंद्र प्रताप सिंहद्वारा चालवल्या जाणाऱ्या शारदा निकेतन स्कूल (इंग्रजी माध्यम), गोखिवरे, गावराईपाडा येथील प्रेम बालिका योगेंद्र प्रतापसिंहद्वारा चालवल्या जाणाºया शारदा निकेतन स्कूल (हिंदी माध्यम), चिंचोटी येथील लोहारपाडा परिसरातील मारुती एज्युकेशन ट्रस्टची ए.डी.वाय. स्कूल, चिंचोटी येथीलच फहीम खान एज्युकेशन ट्रस्टची एफ.के. अकॅडमी स्कूल या चारही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षण संस्था चालकांना नोटीस बजावूनदेखील नमूद शाळांचे संस्थाचालक यांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून माधवी तांडेल यांनी गुरुवारी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन चारही शाळांविरोधात तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जे बेकायदा शाळांचे पीक आले आहे. अवैध शाळा या केवळ व्यवसाय हे एकमात्र निमित्त ठेवून स्थापन करण्यात आल्या आहेत. कारण अवैध शाळांत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यदेखील शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवरच केली जात असते.मुलांच्या भविष्याचे काय?च्वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आकडा डोळे दिपवणारा आहे.च्या शाळांत किती हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. 

टॅग्स :palgharपालघर