शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेफाम स्थानिक स्वराज्य संस्थांना लागणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:32 IST

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना पायाभूत सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नगरविकास विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो.

नारायण जाधवठाणे : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना पायाभूत सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नगरविकास विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. मात्र, हा त्या योजनेवर खर्च न करता तो दुस-याच योजनांवर खर्च करण्याचा कल या स्थानिक स्वराज्य संस्थांचा राहिला आहे. विशेष म्हणजे तो अन्य योजनांवर वळता करताना या संस्था राज्य शासनाची परवानगीही घेत नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे ज्या योजनेसाठी वा विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मदत देण्यात येते, तिचा निधी अन्यत्र वळवल्याने तो विकास प्रकल्प वा त्या शहरातील एखादी योजना रखडते. ही गंभीर बाब राज्य शासनाच्या लक्षात असल्याने आता नगरविकास विभागाने तिची गंभीर दखल घेतली असून असा गुन्हा केल्यास त्यास महापालिकांचे आयुक्त वा नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांना आता जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद नगरविकास विभागाने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकाद्वारे दिली आहे.केंद्राची स्मार्ट सिटी योजना असो वा अमृत योजनेतील निधीअंतर्गत कोट्यवधींची मदत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येते. यात राज्याचाही हिस्सा असतो. तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानासह पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या दुसºयाच योजनांवर खर्च करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक, अशी अनुदाने स्थानिक संस्थांनी त्या योजनांच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडून त्यात जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अलीकडे ठाणे महापालिकेनेही आपल्या अनेक योजना स्मार्ट सिटीत घुसवून किंवा स्मार्ट सिटी प्रस्तावित केलेल्या योजना अन्यत्र वळवल्याचे उघड झाले आहे. अशाच प्रकारचे उपद्व्याप जिल्ह्यातील केडीएमसी, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, मीरा-भार्इंदरसह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांनीही केल्याची चर्चा आहे. यामुळेच अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना शिस्त लागावी, म्हणून नगरविकास विभागाने हे परिपत्रक काढले आहे.कोणतीही योजना वा विकासकामांसंदर्भात राज्य शासनाकडून देण्यात येणारा निधी त्याच कामांवर खर्च करावा. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्रित खात्यात तो वर्ग करू नये.अशा प्रकारे मूळ निधी वा त्यावरील व्याज कायमस्वरूपी वा तात्पुरते अन्यत्र वळवल्यास ती गंभीर अनियमितता मानून त्यास आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाºयांना जबाबदार धरून त्यांना कारवाईस पात्र समजून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.या आदेशांपूर्वी जर एखाद्या योजनेचा निधी अन्यत्र वळवला असेल किंवा तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मूळ खात्यात वर्ग केला असेल, तर त्याचा तातडीने आढावा घेऊन त्या योजनेच्या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडून तो त्यात तत्काळ जमा करावा.