शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील दररोजचा १२ टन कचरा पालिकेसाठी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:34 IST

५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो.

शौकत शेखडहाणू : ५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो. मात्र डहाणूचा डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेले भाजपचे नगराध्यक्ष हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याकडे रहिवासी डोळे लाऊन बसले आहेत.डहाणू नगरपरिषद स्थापन होऊन ३२ वर्षे होत आहेत. या कालावधीत बारा मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र, अद्याप डहाणू नगर परिषदेला शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत: च्या मालकीचे डिम्पंग ग्राऊंड निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे शहरात दररोज साठणारा १२ टन कचरा कुठे टाकावा, अशी गंभीर समस्या नगरपालिका प्रशासनापुढे उभी राहिली आहे.पर्यायान सध्यास्थीतीत लोणपाडा, सरावली येथे उघड्यावर कचरा डंप केला जात आहे. मात्र, त्यामुळे रहिवासी वस्ती त्रस्त झाल्याने नागरिकांकडून तक्र ारीचा सुर निघत आहे. कचºयामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे.डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये पालिकेत रूपांतर केले. राज्यात शेती बागायती, चिकूची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर स्वच्छेच्याबाबतीत अस्वच्छ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.साचणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाकडून शहरात महसूल विभागाच्या मालकीची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.शिवाजीनगर सरावली, सावटा, मानफोड पाडा आणि लोणपाडा परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कचरा टाकल्यानंतर त्यावर जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने हे डंम्पिग ग्राऊंड त्वरीत बंद करावे , अशी मागणी होऊ लागली आहे. निवडून आलेले नवे चेहरे ही समस्या कशी हातळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.