शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड : भाजपा ४, सेना २, बविआ, मार्क्सवादी प्रत्येकी १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:25 IST

पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतीचा कार्यकाल संपल्याने शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने जव्हार, वाडा, डहाणू, विक्रमगड या चार समित्यांवर आपला झेंडा रोवला.

पालघर : या जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतीचा कार्यकाल संपल्याने शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने जव्हार, वाडा, डहाणू, विक्रमगड या चार समित्यांवर आपला झेंडा रोवला. तर सेनेने मोखाडा आणि पालघर येथे आपले सभापती निवडून आणले. अपेक्षेप्रमाणे वसईत बविआचे तर तलासरीत मार्क्सवाद्यांचे सभापती व उपसभापती निवडून आलेत.वसई सभापतीपदी संजय म्हात्रे, उपसभापती किरकिरा  पंचायत समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे संजय म्हात्रे आणि उपसभापतीपदी कविता किरकिरा यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.समितीत बविआचे सहा आणि जनआंदोलन समितीचे दोन सदस्य आहेत. विरोधक गैरहजर राहिले.मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मावळत्या सभापती चेतना मेहेर आणि उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांच्यातील कलह चव्हाट्यावर आला होता. दोघांमधील संघर्षाने टोक गाठले होते. प्रशासन ठाकूर यांच्या बाजूला असल्याने मेहेर यांची कोंडी झाली होती. त्यामुळे पंचायत समितीच्या सभांमध्ये मेहेर आणि ठाकूर यांच्यात नेहमी खटके उडत असत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीतील अंतर्गत कलह उफाळून आला होता. याचे पडसाद नव्या सभापती आणि उपसभापती निवडीत उमटले.मेहेर यांच्यानंतर उपसभापती ठाकूर यांचा सभापतीपदावर दावा होता. मात्र, ठाकूरांना उमेदवारी दिल्यास सभापतीपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी मेहेर यांनी केली होती. अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंत ठाकूर यांचेच नाव आघाडीवर होते. त्याचवेळी मेहेर यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने ठाकूर समर्थकांची कोंडी झाली होती. ठाकूर यांच्यासाठी आघाडीतील अनेक दिग्गजांनी मोर्चेबांधणी केली होती. पण, ठाकूर-मेहेर वाद लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दोघांनाही बाजूला सारुन नव्या चेहºयाची निवड केली. त्यामुळे मावळते उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांना सभापतीपदाला मुकावे लागले. (छायाचित्र/ २)जव्हार सभापतीपदी अर्चना भोरे, उपसभापती सीताराम पागी या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदी भाजपाच्या अर्चना भोरे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सीताराम पागी हे निवडून आले आहेत. सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल ठरला होता. त्यानुसार शुक्र वारी ही निवडणूक घेण्यात आली. एकूण १० सदस्य होते. त्यात भाजपाकडे ५ शिवसेना ३, माकपा २, असे बलाबल होते. उपसभापती पदासाठी तीन अर्ज करण्यात आले होते. यामध्ये यापूर्वीचे शिवसेनेचे उपसभापती सीताराम पागी, माकपाचे लक्ष्मण जाधव तर शिवसेनेचेच सदस्य मनू गावंढा यांचा समावेश होता. यामध्ये सीताराम पागी यांना ६ मते, मिळाली. लक्ष्मण जाधव यांना२ मते, तर मनू गावंढा यांना २ मते मिळाली. त्यामुळे सीताराम पागी हे उपसभापती पदी निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचे अभिनंदन मावळत्या पदाधिकाºयांनी केले. आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी झटून प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही या दोनही नवनिर्वाचित पदाधिकाºयांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलतांना दिली.वाडा सभापतीपदी शेळके तर उपसभापतीपदी पाटील या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी शेळके यांची तर उपसभापतीपदी जगन्नाथ पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोषात स्वागत केले. वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या १२ होती. मात्र वाडा नगर पंचायत घोषित झाल्याने वाडा गणाचे सदस्यत्व रद्द झाले.त्यामुळे एकूण ११ सदस्य उरले होते. भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता केला आहे. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी असे ठरले असून त्यानुसार भाजपाचे अरूण गौंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली नडगे यांनी सभापतीपद दीड व एक वर्ष तर नंदकुमार पाटील, माधुरी पाटील यांनी उपसभापती पद भूषविले आहे.ही पदे मिळविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोचेॅबांधणी केली होती. परंतु, डावपेचात ते कमी पडले. शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाप्रमुखांनीही या निवडणुकीत फारसा रस न घेतल्याने त्यांच्या हाताला काही लागले नाही. विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून विश्वनाथ वेतकोली यांनी काम पाहिले. जिल्ह्यात भाजपा, राष्ट्रवादीची आघाडी याच पंचायत समितीत झाली आहे.नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा , प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले , माजी उपसभापती नंदकुमार पाटील, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, माजी सभापती अरूण गौंड , पंचायत समिती सदस्य मेघना पाटील , ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश पाटील, युवा कार्यकर्ते कुणाल साळवी तसेच पक्षाच्या पदाधिकाºयांनी अभिनंदन केले आहे.मोखाडा  सभापती प्रदीप वाघ, उपसभापती संगीता दिघासहा सद्स्य असलेल्या मोखाडा पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रदीप वाघ तर उपसभापतीपदी संगीता दिघा यांची निवड करण्यात आली. समितीत शिवसेना ३, राष्ट्रवादी २, भाजपा १ असे बलाबल होते. ही निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रतिष्ठेची केलेली असतांना ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्या वाचून करमेना ’ अशी अवस्था असल्येल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाºर्यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीत एकत्र येऊन सत्तेची समिकरणे जुळवली . शुक्रवारी दुपारी ३ वाजता पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संगीता दिघा याची बिनविरोध निवड करण्यात आली हे विशेष. वाड्यातील भाजपा, राष्टÑवादी आघाडीचा बदला सेनेने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन घेतला.डहाणू सभापतीपदी रामा ठाकरे, उपसभापतीपदी शैलेश करमोडा या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडीने विरोधी उमेदवारांचा पराभव करून सत्ता स्थापन केली. पं. स. सभागृहाचा अडीच वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत भाजप - बविआ बिनविरोध सत्ता स्थापन करेल असा कयास असताना ऐन वेळी विरोधकांकडून दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. परंतु, भाजप - बविआच्या उमेदवारांनी बहुमत मिळवून आपली सत्ता अबाधित राखली.डहाणू पं. स. मध्ये एकूण २४ सदस्य आहेत. भाजप ( १० ), राष्ट्रवादी काँग्रेस ( ६), बविआ ( ४ ), शिवसेना ( २), सी पी एम ( २ ) असे बलाबल होते. यावेळी सभापतीपदासाठी भाजपचे रामा जानू ठाकरे व उपसभापती पदासाठी बविआचे शैलेश काळूराम करमोडा यांनी अर्ज सादर केले. त्याचप्रमाणे प्रवीण महादू गवळी यांनी सभापतीसाठी व विजय नवशा नांगºया यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज केल्याने बिनविरोध निवड न होता निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये रामा ठाकरे यांना १३ मते मिळाली तर प्रवीण गवळी याना १० मते मिळाली. एका सदस्याने मतदान केले नाही. उपसभापती पदाकरिता बविआच्या शैलेश करमोडा यांना १३ व विजय नांगºया याना ८ मते मिळाली. ३ सदस्यांनी मतदान केले नाही .अभिनंदन करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, बोईसर विधानसभा आमदार विलास तरे, मनीषा निमकर, विभागीय उपाध्यक्ष भरत राजपूत, तालुका अध्यक्ष विलास पाटील, संगीता काटेला , जि.प.सभापती विनिता कोरे, भरत शहा, शशांक पाटील, रफिक घाची, नौशेरइराणी आदी मान्यवर उपस्थित होते. पंचायत समिती सभागृहात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. किरण महाजन यांनी कार्यवाही पार पाडली.पालघर सभापतीपदी पिंपळे, उपसभापती पाटील शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालघर पंचायत समितीच्या सभापतीपदी मनीषा पिंपळे तर उपसभापतीपदी मेघन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.विशेष म्हणजे या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजपची आघाडी झाल्याने १४ आॅगस्ट रोजी होणाºया जिपच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पालघर पंचायत समितीवर सेनेचे वर्चस्व असून सेना १९ ,बहुजन विकास आघाडी १० तर भाजपचे ४ तर १ अपक्ष असे ३४ सदस्य निवडून आले होते.त्यामुळे बहुमताच्या जोरावर सेनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले होते. त्यांची अडीच वर्षाची कारकीर्द संपुष्टात आल्या नंतर पुढच्या अडीच वर्षासाठी सभापतीपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. पंचायत समितीवर सेनेचे वर्चस्व असल्याने मनीषा पिंपळे,ज्योती पाटील व श्रद्धा घरत तर उपाध्यक्षपदासाठी मेघल पाटील, मुकेश पाटील,सचिन चुरी हे स्पर्धेत होते. मनोर व सफाळे मधील शिवसैनिकांनी पूर्व भागाला न्याय देऊन ज्योती पाटील यांच्या नावाला पसंती दिली होती. अगदी काल उशिरा पर्यंत सभापतिपदी मांडे (सफाळे) गणातील ज्योती पाटील तर उपसभापती मेघल पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची चर्चा होती. मात्र आज अचानक मातोश्री वरून मनीषा पिंपळेचे नाव सभापतीपदासाठी आल्या नंतर सदस्यांमध्ये मोठी नाराजी होती.एका विशिष्ठ समाजाला नेहमीच