शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेचे काम : अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By admin | Updated: November 22, 2015 00:06 IST

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे

पालघर : पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे अंगणवाडी सेविकामध्ये असंतोष पसरला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन पुर्णवेळ कर्मचारी मानत नाही. हे कर्मचारी मानसेवी व अर्धवेळ कर्मचारी समजले जातात. अंगणवाडी कर्मचारी या सर्व महिला कर्मचारी असल्याने त्यांना आपले कुटूंब सांभाळून त्यांच्या योजनांचे अर्धवेळ काम करावे लागते. त्यांना दिलेल्या योजनेच्या कामामध्ये २० ते २२ अत्यावश्यक कामे रोजच्या रोज करावी लागत असून जिल्ह्णातील बालमृत्यू व अतिकुपोषीत बालकांच्या व त्यांच्या माता संदर्भात कसोशीने देखरेख ठेवावी लागते. अंगणवाडी सेवीकांना, कर्मचाऱ्यांना अंगणवाडीच्या कामाखेरीज योजनाबाह्ण कामे सांगण्यात येऊ नयेत असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभाग, दिल्ली यांनी अंगणवाडी सेविकावर योजनाबाह्ण कामे लादु नयेत असे आदेशही काढले आहेत. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयातुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे योजनाबाह्ण काम करण्याबाबत सक्ती व जबरदस्ती केली जात असल्याचे शासनाच्या या सक्तीचा व जबरदस्तीचा निषेध नोंदविण्यासाठी आज संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बुजपाल सिंह, कार्याध्यक्ष मंगला बरफ, राजेश सिंग, सुमन पिंपळे, नलीनी राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी भारताचे नागरीक म्हणून जनगणनेच्या कामाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी शिष्टमंडळाला केले. (वार्ताहर)