शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यातील आदिवासींनी साकारली श्रमदानातून स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:35 IST

गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली

वसई : गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली व इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला.नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात कोलबांव, इंद्राणी, वराला, चिचपाडा, दिव्हादपाडा असे आदिवासी पाडे असून त्यांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी बंदरवाडी येथे सरकारी खाजण जमिनीवर ब्रिटीशकालापासून स्मशानभूमी आहे. आर्थिक हलाखीमुळे पूर्वी येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन केले जात होते. लाकडे उपलब्ध होऊ लागल्यानंतर दगडांचा थर रचून त्यावर चिता रचली जात होती. १९८२ साली गास ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्टँड उभारला. तो मोडल्यानंतर दुसरा उभारला तो ही चोरीला गेल्यावर तिसरा बसविण्यात आला होता. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तो ही गंजून भंगार झाला होता. नवा स्टँड बसवण्यासाठी पाड्यातील लोकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सभापती पंकज चोरघे यांनी तो बसवून दिला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरातच १९ मार्चला महापालिकेने तो काढून नेला. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात होत होते तसे दगडावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पाळी पुन्हा एकदा येथील स्थानिकांवर आली होती.स्टँड काढून नेल्यानंतर आदिवासी पाड्यातील माजी सरपंच चंद्रकांत वळवी, सालू अल्मेडा, पोलीस पाटील सोन्या वळवी यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांची १७ जुलैला भेट घेतली होती. स्टँड नसल्यामुळे भर पावसात चिखलात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आणि नगर अभियंत्यांना तात्काळ तो स्टँड बसवण्याचे आदेश दिले होते. असाच आदेश महापौरांनी या दोन्ही अधिकाºयांना १ आॅगस्टला पुन्हा एकदा दिला होता. पण, तो बसविला गेला नाही.१८ आॅगस्टला आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडण्यात आली होती. त्यांनीही महापालिका अधिकाºयांना तात्काळ तो बसवण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत तो बसविण्यात आला नाही. उलट त्याचा आणि स्मशानभूमीचा नाद सोडा त्याऐवजी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली जाईल. पार्थीव अ‍ॅम्बुलन्समधून भुईगावाच्या स्मशानभूमीत न्या आणि अंत्यसंस्कार करा, असा सल्ला अधिकारी देत असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून हा स्टँड बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरटी दोनशे रुपये प्रमाणे १८ हजार रुपये जमा झाले. त्यातून हे काम झाले.