शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:31 IST

प्रशासनाची व्यवस्था चोख : तुंगारेश्वरला दोन लाख भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

पारोळ : पालघर जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव भाविकांच्या अफाट उत्साहात जल्लोषात साजरा झाला. वसई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या तुंगारेश्वर पर्वतावर गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसात तुंगारेश्वर पर्वतावर भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. वसई तालुक्यातील वसई, विरार आणि नालासोपारा तसेच आजूबाजूच्या गाव परिसरातील प्रसिद्ध शिवालयांतही भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाशिवरात्रीचे निमित्त साधून ठिकठिकाणी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वसई पूर्वेतील सातिवली येथील तुंगारेश्वर पायथ्यापासून गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी तुंगारेश्वराच्या दिशेने प्रस्थान करण्यास सुरुवात केली होती. वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेने आणि एस.टी. महामंडळाच्या परिवहन सेवेने आपआपल्या आगारांतून बसगाड्यांची सोय उपलब्ध ठेवली होती. महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसात वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन बसेसने तर ८०० फेऱ्या पूर्ण करून भाविकांना सहकार्य केले. एस.टी. महामंडळानेदेखील गाड्यांची उपलब्धता ठेवल्याने भाविकांना तुंगारेश्वर पर्वतावर इच्छित वेळेत पोहोचता आले. सध्या हिवाळा संपून उन्हाळा ऋतूचा प्रारंभ झाला असल्याने तुंगारेश्वर पर्वत चढताना दमछाक होणाºया भाविकांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था आणि मंडळांनी शीतपेय, चहा, नाश्त्याचे मोफत वाटप केले. तुंगारेश्वर येथे भंडाºयाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. विरार पूर्वेतील ईश्वरपुरी या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यंदाही या ठिकाणी भंडाºयाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीप गावातील ग्रामस्थांनी भाविकांची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने चोख व्यवस्था ठेवली होती. तर मंदिर व्यवस्थापनाकडूनही भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.पोलीस बंदोबस्त तैनातच्महाशिवरात्री सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त, वन विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी तसेच होमगार्ड ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.च्विरार पूर्वेतील पारोळ येथील प्राचीन शिवमंदिर, विरार फाटा येथील शिवमंदिर, शिरवली येथील श्री तानसेश्वर मंदिर, पापडी येथील श्री हरिहरेश्वर मंदिर, वसई गावातील ऐतिहासिक शिवमंदिर, वसई पूर्वेतील श्री काशीविश्वेश्वर, सातिवली येथील शिवमंदिर, जूचंद्र सोमेश्वरनगर येथे भाविकांनी रांगा लावल्या होत्या. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री