शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात शिवजयंती दणदणीत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:47 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे दणदणीत साजरी करण्यात आली. कुठे ऐतिहासिक मिरवणुका, कुठे शोभायात्रा तर कुठे मोटारसायकलरॅली यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते

पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे दणदणीत साजरी करण्यात आली. कुठे ऐतिहासिक मिरवणुका, कुठे शोभायात्रा तर कुठे मोटारसायकलरॅली यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तर कुठे रक्तदान शिबिर तर कुठे रुग्णांना मोफत फळे वाटप असे सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले गेले होते.जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.जव्हार : येथे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यशवंत नगर येथील टॉवर नक्यावर उपनगराध्यक्ष पद्मा गणेश राजपूत व माजी बांधकाम सभापती गणेश राजपूत यानी ढोल वादनाचे आयोजन केले होते. शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ स्मारकाला नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी वंदन केले. या वेळी विरोधी पक्ष नेते दीपक कांगणे, नगरसेवक कुणाल उदावंत, रहीम लूलानिया, वैभव अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, मुख्याधिकारी वैभव विधाते होते. जव्हार एसटी कर्मचाºयांनी आयोजिलेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. यशराज मुरमे यांनी शिवरायांवर विचार व्यक्त केले.मनोरला भव्य मोटारसायकल रॅलीमनोर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त येथे शिवशक्ती प्रतिष्ठान तर्फे भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या परिसरातील दहिसर, खांबलोली गावात विविध कार्यक्र माचे आयोजन शिवसैनिकांनी केले होते. े उप सरपंच कैफ रईस यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुले, हार अर्पण केला व महाराजांच्या कार्याबद्दल विचार मांडले. या वेळी माजी उप सरपंच साजिद खतीब, सदस्य नितीन भोई, चेतन पाटील, संजय दातेला, दीपक जाधव उपस्थित होते तर सरपंच जागृती हेमाडे याची अनुपस्थिती होती.बोईसर येथे शिवज्योतबोईसर : सकल मराठा समाजातर्फे सकाळी तारापूरच्या किल्ल्यावर शिवज्योत काढण्यात आली. तर दुपारी पारशी ट्रस्ट मैदान ते बोईसर स्टेशन, नवापूर रोड, सकल मराठा कार्यालय, मधुर हॉटेल, ओस्तवाल, शिवाजी चौक, जिजाऊ चौक ते सर्कस मैदान या मार्गावर भव्य मिरवणुकीचे आयोजन झाले.