शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या आठवडाबाजार स्थलांतराला मनाई

By admin | Updated: February 2, 2016 01:40 IST

भार्इंदर येथील आठवडाबाजार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या इराद्याला स्थानिक पोलिसांनी मनाई केली.

भार्इंदर : भार्इंदर येथील आठवडाबाजार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या इराद्याला स्थानिक पोलिसांनी मनाई केली. येथील मार्गावरून उत्तनच्या ज्युडीशियल अकादमी तसेच केशवसृष्टी येथे ये-जा करणाऱ्या व्हीआयपींना त्याचा अडसर तसेच धोका उद्भवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पालिकेकडून बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होऊ लागल्यानंतर प्रशासनाने त्याला नुकतीच सुरुवात केली आहे. ती सुरू झाल्यानंतर प्रशासनाने मीरा रोड येथील सोमवारचा आठवडा बाजारही बंद करण्याची कार्यवाही सुरू करून भार्इंदर येथील रविवारचा आठवडाबाजार परिसरातीलच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला या बाजारातील भाजी-फळे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांखेरीज इतर विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर केल्याने त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात केली आहे. परंतु, यातील स्थलांतराच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणे अपघाताची आहेत. याच रस्त्यावरून दिवाणी ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उत्तन-गोराई मार्गावर असलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल अ‍ॅकॅडमीत सतत येत असतात. उत्तनमध्येच असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टीत भाजपा मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही सतत रेलचेल असते. यात सध्या वाढ झाली असून रविवारी मात्र व्हीआयपींच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. शिवाय येथील भाटेबंदर, पाली बीचवर रविवारच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची वाहनेसुद्धा याच रस्त्यावरून धावत असल्याने रविवारच्या दिवशी तेथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अगोदरच येथील व्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना या रस्त्यावर विशेष बंदोबस्त ठेवावा लागत असताना रविवारचा आठवडाबाजार येथे स्थलांतरित केल्यास तेथे गर्दी वाढून व्हीआयपींना अडसर तसेच त्यांना धोका निर्माण होण्याचा संभव असल्याचे भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले. हे स्थलांतर रोखण्याबाबत आयुक्त तसेच महापौरांना विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)