शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात सीसीटीव्ही , गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:31 IST

गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

वसई : गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी व्यावसायिक, व्यापारी, जागरुक नागरीकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.सध्या गुन्हेगार मोटार सायकलवरून चेन स्नॅचिंग आणि इतर गुन्हे करून पळून जातात. गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण असते. याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असतात. यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे लोक सहभागातून बसवण्यात येणार आहेत. व्यावसायिक, व्यापारी, जागरुक नागरीक यांनी आपण रहात असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाºयांशी संपर्क साधून कॅमेरे बसवण्याचे नियोजित ठिकाण निवडावे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून सुचवलेल्या चांगल्या प्रतीचे कॅमेरे खरेदी करून स्वत: बसवावेत. कॅमेरे खरेदी करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाºयांना पैसे देण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.नियोजित ठिकाणी कॅमेरे बसवल्याने चैन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांना आळा बसेल. आरोपींची ओळख पटवण्यासाठी या कॅमेºयांची मदत होईल. यामुळे जिल्हा पोलीस दलाचे आधुनिकीकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार