शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांना दाखवली ‘करुणा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 23:13 IST

विरारमधील ट्रस्टचा उपक्रम : २३ पक्षी जखमी तर ६ पक्ष्यांचा झाला मृत्यू

विरार : देशभरात मकरसंक्रांतीचा सण बुधवारी उत्साहात साजरा झाला. या सणादरम्यान पतंगबाजी करताना असंख्य पक्ष्यांचा मृत्यू व जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यातील २३ जखमी पक्ष्यांवर विरारच्या करुणा ट्रस्टने यशस्वी उपचार करून १७ पक्ष्यांना जीवनदान दिले. दुर्दैवाने यात ६ पक्ष्यांचा मृत्यू झाला. करुणा ट्रस्टने केलेल्या या कार्यावर प्राणीप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.

दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक पक्षी मांज्यांमध्ये जखमी अवस्थेत अडकल्याच्या घटना समोर येतात. यावर विरारच्या करुणा ट्रस्टने आधीच पक्षी वाचवण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी व बुधवारी असा दोन दिवस मेडिकल कॅम्प लावून प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले होते. हे स्वयंसेवक पक्षीप्रेमींकडून पक्षी मांज्यात अडकल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी जाऊन जखमी पक्ष्याला कॅम्पमध्ये घेऊन यायचे. अशा प्रकारे दोन दिवसात कॅम्पमध्ये २३ पक्षी जखमी अवस्थेत आणले होते. यातील १७ पक्ष्यांना करुणा ट्रस्टने जीवनदान दिले.

या संदर्भात करुणा ट्रस्टचे मितेश जैन यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीच्या सणात अनेक पक्षी जखमी झाले होते. यामध्ये मैना, कबुतर व चिमणी या पक्षांबरोबरच खारूताईचाही समावेश होता. यातील काही पक्ष्यांच्या पायाला तर काहींच्या पंखांना जखमा झाल्या होत्या. त्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले.या कॅम्पमध्ये जखमी अवस्थेत दाखल झालेल्या पक्ष्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील पक्ष्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर आता उपचार होणार आहेत. -मितेश जैन, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष वकरुणा ट्रस्ट.