शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक डबरे यांचा जातीचा दाखला अवैध

By admin | Updated: February 6, 2016 02:06 IST

वसई-विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक समीर डबरे यांचा जातीचा दाखला विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध

शशी करपे,  वसईवसई-विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक समीर डबरे यांचा जातीचा दाखला विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून जप्त करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या डबरे यांनी याविरोधात आता हायकोर्टात धाव घेतली आहे. सोपारा येथील इतर मागासवर्ग प्रभागातून समीर डबरे निवडून आले आहेत. त्यासाठी डबरे यांनी ७ एप्रिल २००३ रोजी भिवंडी प्रांताधिकाऱ्यांकडून मुस्लीम दाल्दी जातीचा दाखला मिळवला होता. निवडून आल्यानंतर डबरे यांनी जातीचा दाखल पडताळणीसाठी कोकण भवन येथील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला होता. त्या ठिकाणी हेमा आल्फोन्सा यांनी दाखल्याला हरकत घेतली होती. त्यानंतर, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, पुरावे तसेच दक्षता पथकाचा अहवाल यावरून सदरचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला आहे. संशोधन अधिकारी एस.आर. तडवी, उपआयुक्त तथा सदस्य ए.पी. दळवी आणि अध्यक्ष व्ही.व्ही. माने यांच्या त्रिसदस्यीय विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय दिला. डबरे यांनी मुस्लीम दाल्दी जातीचा दाखला दिला आहे. पण, इतर मागासवर्गात ही जात नसून मच्छीमार दाल्दी जाती असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. तसेच जातीचा दाखला काढण्यासाठी वडील, काका आणि इतरांची दिलेली कागदपत्रे तपासली असता कुणीही मच्छीमार दाल्दी समाजात मोडत असल्याचे आढळून आलेले नाही. तसेच डबरे यांनी त्यांचा पूर्वजांचा मच्छीमार दाल्दी हा पारंपरिक व्यवसाय असल्याचे १९६७ पूर्वीचे पुरावेही दाखल केलेले नाहीत, असा निष्कर्ष काढत डबरे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला. त्यामुळे डबरे अडचणीत सापडले आहेत. विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणीच्या निर्णयाविरोधात डबरे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने तक्रारदार हेमा आल्फोन्सा यांना याप्रकरणी बाजू मांडण्यासंंबंधी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी येत्या ९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, १६ डिसेंबर २०१५ पर्यंत असलेल्या मुदतीत पाच नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत. त्यांच्याबाबतीत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. पाचही नगरसेवकांनी तांत्रिक बाबी पुढे करीत पडताळणी प्रमाणपत्र देण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे केले असले तरी पालिका अथवा राज्य निवडणूक आयोगाकडून यावर प्रतिक्रियाही दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.