शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: August 26, 2015 23:59 IST

आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करूनही ऐकत नसलेल्या सखाराम सुखाड खेवरा (३०, रा. झाडीपाडा, डहाणू) याच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण दांडेकर

पालघर : आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करूनही ऐकत नसलेल्या सखाराम सुखाड खेवरा (३०, रा. झाडीपाडा, डहाणू) याच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण दांडेकर व त्याचा मुलगा सचिन दांडेकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. १८ आॅगस्ट रोजी मंगळवारी पालघरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.डहाणू तालुक्यातील गांगणगाव (दांडेकरपाडा) येथे राहणारे लक्ष्मण धर्मा दांडेकर यांची मुलगी गुजरात राज्यातील उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामावर जायची. तिचे तेथेच कामावर असलेल्या सखाराम खेवरा याच्याशी पे्रमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी सखारामच्या घरी जाऊन माझ्या मुलीला तुमच्या घरात द्यावयाची नाही, तरी सखाराम याने माझ्या मुलीचा नाद सोडावा, अशी समज दिली होती. परंतु, त्या दोघांचे लपूनछपून प्रेमसंबंध सुरूच राहिल्याने दि. २२ जानेवारी २०११ रोजी आरोपी लक्ष्मण दांडेकर व त्याचा मुलगा सचिन दांडेकर यांनी वसा-करजगाव रस्त्यावर कामावरून सायकलवर येणाऱ्या सखाराम यास गाठले. या वेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर आरोपींनी आपल्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये लपवून ठेवलेला लोखंडी हातोडा काढून सखारामच्या डोक्यात घातला. सखारामला जखमी अवस्थेत तलासरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गणपत खेवरा यांनी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने २८ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकारी वकील पी.एच. पटेल यांनी पुरावे न्यायालयापुढे सादर केले.