शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकी फणसांची धूम

By admin | Updated: May 7, 2017 01:34 IST

ध्या कोकणातील फणस बाजारात आलेला नसला तरी कर्नाटकातल्या फणसाने विक्रमगडच्या बाजारात धूम

राहुल वाडेकर /  लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : सध्या कोकणातील फणस बाजारात आलेला नसला तरी कर्नाटकातल्या फणसाने विक्रमगडच्या बाजारात धूम चालविली आहे. कोकणी फणस येण्यात अजून किमान तीन आठवडे बाकी आहेत. त्या आधीच हा फणस आल्याने खवैय्ये खूष आहेत. फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकण मेवा म्हणजेच फणस तेथूनच तो अनेकविध भागात विक्रीला येत असतो़ व आता तर कच्च्या फणसापासून देखील विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जात असल्याने उपवासाला व इतर वेळेसही या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे़ त्यामुळे सध्या फणसाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेले दिसत आहे़ परंतु अदयाप चांगला फसण तयार होण्यास किमान २१ दिवसांचा काळ जाणार आहे त्यामुळे कोकणातील फणस अदयाप बाजारात दाखल झालेला नाही़ त्याच बरोबर वातावणात बदल झाल्याने आंबा, काजूंवर जसा परिणाम झाला तसाच वातावरणाचा देखील फणसांच्या उत्पादनावर परीणाम झाला आहे. त्यामुळे यंदा कोकणातील मेव्याची आवक थोडयाफार प्रमाणात घटणारच आहे़ याच गोष्टींचा फायदा घेऊन कर्नाटकीय फणस बाजारात दाखल झालेले आहेत. फणस दिसला की प्रत्येकाला कोकणाची आठवण होते़ कारण बाजारात येणारे बहुतेक फणस हे कोकणातलेच असतात़ हे फणस मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून बाजारात दाखल होतात़ मात्र विक्रमगड व परिसरातील बाजारपेठेत मेच्या सुरुवातीलाच फणासाचे गरे दिसू लागले आहेत़ खाण्यास गोड व उन्हात थंडावा देणारे असल्याने फणस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंंबड उडते आहे़ परंतु काही ग्राहकांनी सांगितले की कोकणातील फणसाला जी गोडी व स्वाद, चव आहे तो हया कर्नाटकीय फणसामध्ये तेवढया प्रमाणात नाही़ विक्रमगड तालुक्यातही आता मोठया प्रमाणावर आदिवासी लोक देखील फणसांचे उत्पन्न घेत आहेत. एका झाडाला मोठया प्रमाणावर फणसाची फळे येत असल्याने चांगले अर्थार्जन होते. कर्नाटकीय फणसाच्या सुगंधाने बाजारात घमघमाट पसरलेला आहे़ वटपोर्णिमेला महिलांना फणसाच्या गऱ्याची आवश्यकता असते म्हणून पुजेसाठी फणसाला मागणी मोठया प्रमाणात असते़ मात्र यंदा मे महिन्याचें सुरुवातीलाच फणसाची आवक वाढली आहे. हा फणस कर्नाटकातूनच येत असल्याचे येथील विक्रेते सुरेंद्रम यांनी सांगितले. फणसाचे गरे ९० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. एका फणसासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. आवक वाढल्यानंतर हेच गरे ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जातात़ कोकणाचा फणस येण्याच्या अगोदरच विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकीय फणसाने ग्राहकांना भुरळ घातली आहे़ त्यामुळे सध्यातरी ग्राहक महाग का होईना फणसाचे गरे मोठया आवडीने खरेदी करत आहेत़पिकण्यापूर्वीच फणस आणले बाजारात बाजारात विक्री होत असलेल्या फणसांपैकी अनेक फणस पुरेसे पिकलेले नाहीत. असेही आढळून येते इतरांपेक्षा लवकर बाजारात माल नेऊन तो विकण्याला व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिल्यामुळे हे घडते आहे. त्यामुळे फणस विकत घेतला तरी तो काही दिवस घरात पिकवून मग खाण्याचा द्राविडी प्राणायाम ग्राहकांना करावा लागतो आहे. छोट्या फणसाच्या बाबतीत हा अनुभव अनेकांना आलेला आहे.