शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

वेलची केळीला ग्रासले बुरशीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:18 IST

प्रजाती नामशेष होणार : तपासणीसाठी नमुने पालघर कृषी विज्ञान केंद्रात

वसई : केळीच्या बागा हे एकेकाळी वसईचं वैभव होते. वसईची सुकेळी केळी देशभर प्रसिध्द होती. मात्र, आता हाताच्या बोटावर मोजता येणारे शेतकरी या केळीची लागवड करीत असतांना तिच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून आलेल्या बुरशीजन्य रोगाने (फंगस डिसीस) तिची जातच वसईतून नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे केळीच्या इतर जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला नसला तरी, त्याचे समूळ उच्चाटन कसे करता येईल याबाबत कृषी पर्यवेक्षकांनी रोगग्रस्त केळ्यांचे व मातीचे नमुने तपासणीसाठी पालघर कृषी विज्ञान केंद्रात तपासणीसाठी पाठविले आहेत.

परेरा यांच्या चार एकरामध्ये केळीच्या बागा आहेत. यात वेलची, बिनबोंड, लोखंडी बंगाली, बनकेळ, भुरकेळ, हजारी, आंबट वेलची, राजेळी अशा विविध जातीच्या केळींची लागवड केली आहे. त्यातील दोन एकरमध्ये वेलचीच्या २००० केळीच्या शिंग्यांची दोन वर्षापूर्वी त्यांनी लागवड केली होती. त्यातून त्यांना ९९ टक्के किफायतशीर उत्पन्न मिळाले. मात्र, चालू वर्षी अचानक या केळ्यांच्या बिसकेळ (दुसऱ्या टप्प्यातील उत्पन्न) शिंग्या रोग येऊन मरू लागल्यामुळे परेरा यांनी वसईतील कृषी परिक्षक अधिकारी साईनाथ पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

कृषी अधिकाºयांनी गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा परेरा यांच्या केळीच्या बागांमधील रोगग्रस्त केळ्यांची पाहणी केली असता, फक्त वेलची जातीच्या केळ्यांवर बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याचे लक्षात आले. काही प्रमाणात या रोगाची लागण भुरकेळीलाही झाली आहे. याबाबत त्यांनी रोगग्रस्त केळीच्या कंदांचे व तेथील मातीचे नमुने पालघर कृषी विज्ञान केंद्रात तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच, या केळीच्या बागांवर ूंस्र-७ 50२स्र, ूं१३ंस्र ऌ८१िङ्मूँ’ङ्म१्रीि ५० टक्के फवारणी करण्यास सांगितले आहे. येत्या काही दिवसात या औषधामुळे हा रोग आटोक्यात येतो का याबाबत निरिक्षण करता येणार आहे. पुढील आठवड्यात पालघर कुषी विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉ. ढाणे हे वसईतील शेतकºयांच्या रोगग्रस्त केळ्यांच्या बागांना भेट देतील. वातावरणातील उष्णता कमी झाल्यामुळे वेलचीला या फंगस डिसीसचा फटका बसला. काही वर्षांपूर्वी बंचीटॉप नावाचा कॅन्सरसारखा रोग केळ्यांवर आला होता.रोगाची लक्षणे : केळीची पाने पिवळी होऊन गळून पडतात. जमीनीखालील कंद खणून काढला असता त्यावर किडीचा प्रादुर्भाव दिसतो. खोडकिड्यासारखा केळीचा मुख्य गाभा कीड खाउन टाकत असल्यामुळे झाडाची वाढ होत नाही.शेतकºयांनी करावयाचे उपाय : कॉपॅक्ट प्लस किटकनाशकाची फवारणी करणे, कॅन एक्स ५० एसपी किटकनाशकाची १० लीटर पाण्यात (२० ग्रॅम ) मिश्रण करून फवारणी, मोरचूद व चुना याचे एकास दोन प्रमाण करून केळीच्या बुंध्यावर ठेवणे, नविन लागवड करताना जुन्या ठिकाणी जाळ करून ती जागा निर्जंतुक करून घेणे.गतवर्षी मिळाले भरपूर उत्पन्न, नफाउत्तर वसईत मोजक्या शेतकºयांकडे केळीची लागवड केली जाते. परेरा यांनी गेल्या काही वर्षात परंपरागत शेणखत व पेंड याचा वापर करून केळ्यांचे मोठे उत्पन्न घेतले आहे. दोन एकर शेतीत वेलची केळ्याची लागवड करून तसेच पूजेसाठी छोट्या शिंग्या व केळफूल याच्या विक्रीतून गतवर्षी साडेपाच तेसहा लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.चालू वर्षात बिसकेळ रोगग्रस्त होऊ लागल्यामुळे त्यांना चिंतेने ग्रासले आहे. दोन तलाव, राजोडी, नाळा, नांदाण, आगाशी, ज्योती आदि ठिकाणी वेलची केळ्यांवर याच रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. जोडधंदा म्हणून परेरा नेवाळी, टगर, जास्वंद या फुलांची तर शेवग्याच्या शेंगा, वांगी, अ‍ॅपल बोर, चिकू, नारळ, कोकम, आंबा आदिंचीही लागवड करून उत्पन्न घेत असतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार