शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परकीय नागरिकांविराेधात धडक माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:07 IST

चार दुकाने, एका सदनिकेवर हाताेडा : पाेलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई

 

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : पूर्वेतील परिसरात राहणाऱ्या नायजेरियन आणि परकीय नागरिकांच्या बेकायदा व्यवसाय ठिकाणांवर महापालिका आणि तुळिंज पाेलिसांनी शुक्रवार सकाळपासून  संयुक्त कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत चार बेकायदा दुकाने व एक सदनिका हातोड्याच्या साह्याने तोडण्यात आली आहेत.तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक जण बेकायदा वास्तव्य करत असून घरमालकांना नोटीस देण्याचेही पोलिसांनी सुरू केले आहे. १७ इमारतींत नायजेरियन लोक बेकायदा राहत व व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रभागाला १८ आणि १९ जानेवारीला तुळिंज पोलिसांनी पत्रव्यवहार केला. शुक्रवारी सकाळी महापालिकेचा  ‘ब’ प्रभाग आणि तुळिंज पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरुवात केली. नालासाेपारा पूर्वेतील  प्रगतीनगरमधील वेदांत अपार्टमेंटमधील चार बेकायदा दुकाने हातोडीच्या साहायाने तोडली. या चार दुकानांत नायजेरियनने हॉटेल, सलून सुरू केले होते. तसेच बसेरा गार्डन अपार्टमेंटमधील एका बेकायदा खाेलीत ते राहत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नायजेरियन १३, युगांडा ४, अमेरिका २, फिलिपाइन्स ५, पाकिस्तान १, जॉर्जिया १, यूएई २, श्रीलंका २, दक्षिण कोरिया १ असे एकूण ३१ परदेशी नागरिक नालासाेपारात बेकायदा राहत आहेत.

पेल्हार येथील सुमारे २० हजार चाैरस फुटांचे ताेडले बेकायदा बांधकाम  nमहापालिका आयुक्त डी. गंगाधरन आणि अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी सीयूसी पथकाचे सहायक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी ही कारवाई केली.बेकायदा परकीय नागरिक राहणाऱ्या जागेवर, व्यवसाय करणाऱ्या ठिकाणांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशा इमारतींची नावे व यादी पालिकेला दिली आहेत. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणेतुळिंज पोलिसांकडून  पत्रव्यवहार झाला आहे. प्रभाग सहायक आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारपासून या कारवाईला सुरुवात केली आहे.- आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका