शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेता बांधकाम केलेल्या इमारतींना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:34 IST

वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची स्थापना झाल्यापासून याठिकाणी अधिकृत बांधकामांबरोबरच अनधिकृत बांधकामांचा जोरही वाढला आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची स्थापना झाल्यापासून याठिकाणी अधिकृत बांधकामांबरोबरच अनधिकृत बांधकामांचा जोरही वाढला आहे. मध्यंतरी पालिकेने नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून अनधिकृत बांधकामं वैध करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. त्याअनुषंगाने काम करताना आता पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना पालिकेने शास्ती आकारण्यास सुरूवात केली आहे.कोणतेही रहीवास बांधकाम करण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेकडून परवानगी घेणे अनिवार्य असते. तसेच संबंधीत बांधकामाचा पाया रचल्यानंतर त्या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. संपूर्ण बांधकाम तयार झाले की, मग पालिकेकडून त्याला भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. एकदा भोगवटा प्रमाणपत्र मिळाले की, इमारत अधिकृत असल्याचा शिक्का त्यावर बसतो. अशा इमारतीला पालिकेकडून सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. बांधकाम अधिकृत ठरवण्याची पालिकेची सदर नियमावली असली तरी पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेता नागरिकांना अंधारात ठेवून त्यांना तयार बांधकामं विकली जातात. काही विकासक आर्थिक फायद्यासाठी बेकायदा बांधकामं बोगस कागदपत्रांचा आधार घेत नागरिकांना विकतात. त्यामुळे पालिकेचा महसूल तर बुडताचे शिवाय नागरिकांचेही नुकसान व फसवणूक होते. याबाबत महापालिकेने आता ठोस भूमिका घेत ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या सर्व इमारती अनधिकृत ठरवल्या आहेत. त्यामुळे संबंधीत इमारतींना शास्ती लावण्यास पालिकेने सुरूवात केली आहे.ओसी नसलेल्या इमारती दहा ते पंधरा वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर शास्ती आकारत असल्याने या इमारतींमधील रहिवाशी धास्तावले आहेत. मुळात ज्या बांधकाम व्यवसायिकांनी या इमारती बांधल्या आणि भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. त्यांच्यावर कारवाई करायला हवी, रहिवाशांना नाहक भुर्दंड का? असा सवाल रहिवशांकडून विचारला जात आहे. फसवणूक झालेल्या या नागरिकांनी शास्ती आकाण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.सर्वसामान्यांची गोचीया नव्या नियमामुळे बहुतांश इमारतीतील नागरिकांना आता नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.शहरात बऱ्याचशा अशा इमारती आहेत ज्यांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्या अनधिकृत ठरतात. अशा बांधकामांना शास्ती आकारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार