शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:25 IST

प्रत्येक घरात वीज दिल्याचा दावा करणाऱ्यांनी : मोखाडा, तलासरीत सर्वेक्षण करावे

पालघर : बहुजन विकास आघाडीचे नेते आ.हितेंद्र ठाकूर व उमेदवार बळीराम जाधव या दोघांनी बुधवारी जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला. बळीराम जाधव यांनी मोखाडा, जव्हार, खोडाळा व विक्र मगड या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते भारावून गेले. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, हे सरकार गोरगरीबांचे नसून मूठभर उद्योगपतीसाठी राबणारे सरकार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असतांना, राज्य सरकार मात्र आपल्याच मस्तीत आहे. ग्रामीण भागात हजारो आदिवासी मुले कुपोषणांमुळे मरणाच्या दारात आहेत, परंतु सरकारला त्याची चाड नाही. गुरांना चारा नाही, आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नाही, मनरेगा योजनेंतर्गत असलेली कामे बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पायपीट करावी लागत आहे, अशी स्थिती असताना सरकार मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई,नालासोपारा व वसई गावात झालेल्या चौकसभेत सरकारच्या गैरकारभारावर चौफेर टीका केली.ते म्हणाले, अच्छे दिन राहिले दूर, पूर्वी होते ते दिवस राहिले म्हणजे आपण खूप काही मिळवल्यासारखे होईल, काँग्रेसच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलून स्वत:च्या नावावर खपवणारे हे सरकार आहे.३५० चा सिलिंडर ८०० ला हे अच्छे दिन म्हणायचे का?ही मंडळी मते मागायला आली की त्यांना जाब विचारा.गॅस सिलिंडर ३५० रु. होता तो आता ८०० रु . झाला. याला आपण अच्छे दिन म्हणायचे का ?देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली, असा दावा करणार्या मोदी सरकारने मोखाडा भागात अंधारात चाचपडणाºया गावांचे सर्व्हेक्षण करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर