शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

भूसंपादन नसतांनाच बुलेट ट्रेनचे भूमीपूजन, शेतकरी, भूमीपुत्र संतप्त, प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:21 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत...

हितेंन नाईकपालघर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत. त्याचा सर्व्हेही पूर्ण झालेला नाही, असे असतांना या प्रकल्पाचे भूमीपूजन झालेच कसे असा सवाल भूमीपुत्रांनी केला असून काही झाले तरी हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.मुंबईसह वैतरणा ते डहाणू दरम्यान उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरविण्या ऐवजी त्यांच्या जमिनी प्रशासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात पालघर व गुजरात राज्यातील काही संघटनानी एकजुटीचे दर्शन घडवीत रस्त्यावर उतरुन आपला विरोधाची ताकद दाखवून दिली आहे. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन करून विकासाच्या नावाखाली आमच्या छाताडावरून बुलेट ट्रेन नेण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याने शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांमधून तीव्र संतप्त भाव उमटत आहेत.जिल्ह्यातील तब्बल ११४ गावपाड्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग जात असून सर्वाधिक गावपाडे पालघर तालुक्यात आहेत.नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार ही गावे त्यात अंतर्भूत असल्याचे सांगण्यात येत असून अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकांमध्ये कॉर्पोरेशनच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत लागणाºया आवश्यक त्या परवानग्या घेतलेल्या नाहीत, संबंधित ग्रामसभा पुढे या प्रकल्पाची माहिती ठेवली नसतांना, संबंधित शेतकºयांची जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविली गेली नसताना घाईघाईत याचे भूमीपुजन ही उरकण्यात आले आहे. मात्र मुंबईकराना लोकलच्या माध्यमातून नरकयातना भोगायला लावून स्वत:चा टेंभा मिरविण्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्यास भूमीपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अनेक लहान-मोठ्या शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जाणार असून सर्वसामान्यांना भूमिहीन करून ही ट्रेन जिल्ह्यातील ११४ गावपाड्यातील शेतकºयांच्या छाताडावरुन जाणार आहे. अनेक पातळी वरून विरोध होत असतांना बुलेट ट्रेनचा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येणार असल्याचा निर्धार केंद्र व राज्यसरकारने केला असून त्याला प्रशासनाची साथ लाभत आहे.तलासरी तालुक्यातील : वरवाडा, उपलाट, धामणगाव, मानपाडा, सवणे, कारजगाव, अवरपाडा, झरी-पाटीलपाडावसई तालुक्यातील : पोमण, कामण, देवदल-कोलही, चिंचोटी, सातीवली, वालीव, धानिव, चांदनसार, शिरगाव, खीरपाडा, पोइनार, टोकरे-धानीसार, कसराली, धानीसार, तिवरी पाडा, जिम्बल पाडा, हावळ पाडा, वनी पाडा, राजीवली, गोखिरे, गावरान पाडा, गास पाडा, गासकोपरी ही गावेडहाणू तालुक्यातील : गागणगाव, घंदाने, कोमगाव, वणई, नाईक पाडा, मधी पाडा, भवर पाडा, गोवणे, आखरमत पाडा, साखरे, कोठार पाडा, बवजा पाडा, डोंगरी पाडा, बघाडी पाडा, कोटमबी, दाभाडे, गावठाण पाडा, वणी पाडा, इभाड पाडा, नावसाखरे, पाटीलपाडा, पारसी पाडा, करमोड पाडा, रेवाडी पाडा, काकड पाडा, आंबेसरी ही गावे.पालघर तालुक्यातील : माकणे, कपासे, मायखोप, रामबाग, कान्द्रेभुरे, सरतोंडी, सरावली, कर्दळ, जलसार, शीलटे पाडा, विराथन बुद्रुक, तिघरे, मांडा, ठाणेपाडा, ठाकूरपाडा, देवीपाडा, रोठे, मावळा, हनुमान पाडा, भुताळमानपाडा, खैरापाडा, दांडाळपाडा, उम्बरपाडा, कमारे, वरखुंटी, नवली, नवली पाडा, अंबाडी, अर्जुनपाडा, शेलवली, धामटने, भही पाडा, देवखोप, नंडोरे, कळंबेदी, ठाकरे पाडा, काकरे पाडा, पडघे, कोळीपाडा, कल्लाळे, मान, बोईसर, बेटेगाव, भुताळपाडा, खुताड, शिगाव, वाळवे पाडा, बामन पाडा, सुमडापाडा, चंद्रा नगर ही गावे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनVasai Virarवसई विरार