शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बैलाला इंजेक्शन देऊन मांस तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:31 IST

लोकमान्य नगर येथील निर्मनुष्य भागात गोवंशाला इंजेक्शन मारून बेशुद्धावस्थेत त्यांची हत्या करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार दक्ष तरुणांनी उघड केला आहे.

- हितेन नाईकपालघर : लोकमान्य नगर येथील निर्मनुष्य भागात गोवंशाला इंजेक्शन मारून बेशुद्धावस्थेत त्यांची हत्या करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार दक्ष तरुणांनी उघड केला आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी हत्यारे, इंजेक्शनसह स्विफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली आहे.शुक्र वारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पालघर (पू) जांभळे पाडा येथे राहणारा देवेश भूतकडे हा तरु ण आपल्या मित्रांसह मोटारसायकल वर बसून घराकडे चालला होता. लोकमान्य नगर जवळील बिडको औद्योगिक वसाहतीच्या बाजूला एका निर्मनुष्य भागात एक स्विफ्ट गाडी उभी असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना संशय आल्याने ते गाडी कडे जात असताना चालकाने गाडी सुरू करून पळण्याचा प्रयत्न केला असता गाडीला अपघात झाला. आणि त्यातील चोरट्यानी गाडीच्या बाहेर उड्या घेत पलायन केले. तरु णांनी तात्काळ पालघर पोलिसांना माहिती दिल्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पो.नि. पुकळे, सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्या नंतर स्विफ्ट गाडीत हत्यारे, गार्इंना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, मोबाईल नंबर, खानीवडे टोल नाक्यावर रक्कम भरलेली पावती आदी साहित्य सापडले. या वेळी अत्यंत दाट झाडीत एक गाय अर्धमेल्या अवस्थेत पडल्याचे दिसली. तर बाजूलाच जनावरांचे अवशेष, जमिनीवर पडलेले रक्त आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोष्टी ताब्यात घेतले असून ते तपासासाठी मुंबईला पाठविण्यात आल्याचे पो.नि. पुकळे यांनी लोकमतला सांगितले. या निर्मनुष्य भागात चरायला आलेल्या गाई ना इंजेक्शन देऊन त्यांची हत्या करून त्याचे मांस गाडीत भरून नेले जात असल्याचा संशय दूध उत्पादकांनी व्यक्त केला आहे. या घटनास्थळा पासून जवळच असलेल्या भडवाड पाडा, जुना पालघर, वळण नाका, या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक गाई, वासरू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या कर्सन भरवाड यांच्या ३ गाई, नरेश भरवाड यांच्या २ गाई, लक्ष्मण भरवाड यांच्या ४ गाई व ३ वासरू आणि अजय भरवाड यांच्या २ गाई चोरीला गेल्याचे त्यांनी लोकमत ला सांगितले. या बाबत भाजपच्या पदाधिकारी साईली भानुशाली यांनी वर्षभरापूर्वी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊनही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले. या प्रकरणी पालघर पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>गाडीच्या मालकांचा शोध सूरु असून ह्या मागे टोळी असण्याच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे.- विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी